घरात चांगल्या वस्तू ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा, सौख्य आणि समृद्धी येते. परंतु घरात अशा काही वस्तू असतात ज्या घरात कधीही ठेवू नयेत. बऱ्याचदा आपण कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिलेज याकडे जास्त लक्ष केंद्रित करतो परंतु कोणत्या वस्तू घरात ठेवू नये याबाबत आपल्याला माहिती नसते. जर या वस्तू आपल्या घरी असल्या तर घरात अशांती, वाद, घरात नकारात्मकता वाढते, आर्थिक अडचणी निर्माण होतात. आज आपण या लेखातून जाणून घेऊयात कोणत्या वस्तू घरात ठेवू नयेत.
तुटलेल्या किंवा फुटलेल्या वस्तू
घरात कधीही तुटलेल्या वस्तू ठेवू नये याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच तुटलेले आरसे, भांडी, देवाच्या मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्यास अशुभ मानले जाते.हे घरात नकारात्मक वाढवते आणि दारिद्र्य आणू शकते.
दु:खद चित्रे
युद्ध, रडणारी व्यक्ती, आगीचे दृश्य, वाघ- सिंह आक्रमण करताना असे भयावह चित्र घरात ठेवू नयेत. या गोष्टी घरात अशांती आणि तणाव निर्माण करतात.
बोनसाई आणि काटेरी झाडे
बोनसाई झाड आर्थिक वाढ अडवते, तर काटेरी झाडे अपवाद गुलाब हे घरात कलह वाढवू शकतात.
बिगडलेली घड्याळे
बंद पडलेली किंवा तुटलेली घड्याळे वेळेच्या अडथळ्यांचे प्रतीक मानली जातात. अशा घड्याळांमुळे घरात प्रगती थांबते.
काळसर किंवा फाटलेले पडदे
काळसर किंवा फाटलेले पडदे आणि चादरींमुळे घरात नकारात्मकता वाढते आणि वैवाहिक आयुष्यात तणाव येऊ शकतो.
देवघरात अस्वच्छ वस्तू
देवघरात चुकूनही अस्वच्छ वस्तू ठेवू नये या वस्तू ठेवल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुभ फल मिळत नाही.ही काही सामान्य वास्तुशास्त्र आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित माहिती आहे. तुम्ही यातून तुमच्या विश्वासाप्रमाणे योग्य निर्णय घेऊ शकता.
हेही वाचा : Vastu Tips : या सवयींमुळे घरात येते दारिद्र्य
Edited By : Prachi Manjrekar