खास प्रसंग हा मेकअपशिवाय अपूर्ण आहे. ऑउटफिट आणि ज्वेलरीप्रमाणे मेकअप देखील महत्वाचा भाग असतो. मेकअपमुळे आपला लूक परिपूर्ण आणि सुंदर दिसतो. बऱ्याचदा आपण कोणत्याही खास कार्यक्रमाला जाताना मेकअप करायला खूप वेळ लागतो.खूप प्रोडक्टस असल्यामुळे जास्त वेळ लागतो. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही झटपट मेकअप करण्यासाठी आपण कोणते प्रॉडक्टस वापरू शकतो.
झटपट मेकअप करण्यासाठी तुम्ही काही प्रॉडक्टस वापरू शकता. तुमचा लूक परिपूर्ण करू शकता. खूप प्रॉडक्टसचा वापर केल्यामुळे आपला लूक परिपूर्ण आणि आकर्षक देखील दिसत नाही. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, कोणते मेकअप प्रॉडक्टस आपण वापरू शकतो.
फेसवाॅश
मेकअप सुरु करण्याआधी चेहरा स्वच्छ फेसवाॅशने धुवून घ्या. फेसवॉश न करता मेकअप केल्याने तुमचा लूक खूप खराब दिसू शकतो. तसेच त्वचा देखील ड्राय दिसेल. त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी फेसवॉश करणे अत्यंत गरजेचं आहे. जास्त केमिकलयुक्त फेसवॉश वापरू नका याने तुमचा चेहरा खराब होऊ शकतो. नैसर्गिक घटक असलेले फेसवाॅश वापरू शकता.
मॉईश्चरायझर
मॉईश्चरायझरमुळे आपली त्वचा कोरडी होत नाही. त्वचा चांगली राहते. आपल्या त्वचेसाठी मॉईश्चरायझर खूप महत्वाचे आणि गरजेचे असते. हल्ली बऱ्याच ठिकाणी मॉईश्चरायझर मिळते. तुम्ही तुमच्या स्किनटोन किंवा चेहऱ्याप्रमाणे मॉईश्चरायझर लावू शकता.
कॉम्पॅक्ट पावडर
तुम्ही फाउंडेशन म्हणून बीबी आणि सीसी क्रीम देखील वापरू शकता. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावून बेस तयार करू शकता.
आयलाइनर
डोळे आकर्षक आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही आयलाइनर लावू शकता. आयलाइनरमुळे तुमचा मेकअप अजून सुंदर आणि आकर्षक दिसेल.
लिपग्लॉस
तुम्ही लिपस्टिकच्या व्यतिरिक्त लिपग्लॉस देखील वापरू शकता. लिपग्लॉसने तुमचे ओठ अजून सुंदर दिसतील. नैसर्गिक घटक असलेलं लिपग्लॉस
वापरू शकता. तसेच घरी देखील बनवू शकता. लिपग्लॉसने तुमचे ओठ शायनी दिसतील.
झटपट मेकअपसाठी तुम्ही हे मेकअप प्रॉडक्टस वापरून तुमचा लूक सुंदर आणि आकर्षक बनवू शकता.
हेही वाचा : Beauty Tips : ट्रॅव्हलिंग करताना कॅरी करावे फक्त हे 4 कॉस्मेटीक
Edited By : Prachi Manjrekar