तुळशी विवाह कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला साजरा केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी देवी तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराशी झाला होता, असे पौराणिक कथेत सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी तुळशीची आणि शालिग्रामची पूजा करण्याची परंपरा आहे. असे म्हणतात, या तुळशी विवाहाच्या दिवशी तुळस आणि भगवान शालिग्रामची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील संकटे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते. शास्त्रानुसार, या दिवशी तुळशीला काही गोष्टी अर्पण करणे शुभ मानले जाते. पाहूयात, तुळशी मातेला कोणत्या गोष्टी अर्पण करणे शुभ आहेत.
पंचामृत –
तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करणे शुभ असते. तुम्ही या दिवशी पंचामृत अर्पण करू शकता, ज्या भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रिय आहेत. असे म्हणतात की, पंचामृत अर्पण केल्याने कुटूंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते.
रताळे –
तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला रताळ्याचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, या दिवशी रताळे अर्पण केल्याने कुटूंबातील वादविवाद कमी होतात आणि घरात धनधान्यांची भरभराट होण्यास सुरूवात होते. प्रगती दरवाजे उघडले जातात.
खीर –
खीर भगवान विष्णू आणि देवी तुळशीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशी विवाहाला तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता. खीर अर्पण केल्याने ग्रह दोष कमी होतो. ज्यामुळे आयुष्यात शुभ परिणाम दिसू लागतात.
2024 मधील तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त –
वैदिक पंचांगानुसार, यंदा कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 04 वाजून 04 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 01 वाजून 01 मिनिटांनी हा मुहूर्त संपणार आहे. पण, उदयतिथीमुळे 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा होणार आहे. यंदा तुळशी विवाह दोन शुभ मुहूर्तांमध्ये पार पडेल. त्यानुसार, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग असे दोन शुभ योग जुळून आले आहेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde