घरात सुख-शांती नांदावी, कुटूंबातील सदस्यांची प्रगती व्हावी असी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, अनेकदा प्रयत्न करूनही या गोष्टी साध्य होत नाही. अशावेळी वास्तूशास्त्राची मदत घेण्यात येते. वास्तूशास्त्रात, घरात सुख-शांती नांदण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. या उपायाच्या साहाय्याने घरात सकारात्मकता वाढवून नकारात्मकता दूर होते. काही वेळा घरातील नकारात्मकता घरात असणाऱ्या गोष्टींमुळे निर्माण होते. त्यामुळे जाणून अशा गोष्टी ज्या घरात नकारात्मकता वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात.
काटेरी झाड –
हल्ली घर सजवण्यासाठी इनडोअर प्लांटचा वापर करण्यात येतो. यामध्ये काटेरी वनस्पतींचा वापर जास्त केला जातो. पण, अशा वस्तू घरात ठेवणे शुभ नसते. अश्या वनस्पती घरात ठेवून कलह आणि अशांतता निर्माण होते.
तुटलेली मूर्ती
घर सजवण्यासाठी चुकूनही खंडीत किंवा तुटलेली मूर्ती वापरू नयेत. हा नियम सर्वात आधी देवी-देवतांच्या मूर्तीसाठी लागू होतो. असे म्हणतात की, घरात भंग किंवा खंडीत मूर्ती ठेवल्याने वास्तूदोष निर्माण होतो.
पेटींग्स –
घरात पेटिंग्स लावताना पूर्ण खोलवर विचार करणे आवश्यक आहे. वाळवंट, खंडर अशा पेटिंग्स घरात लावू नये.. अशा वस्तू घरात लावणे अशुभ समजले जाते.
प्लास्टिकची फूले –
कितीतरी वेळा आपण पाहतो की, घरात प्लास्टिकच्या फूलांचा वापर केला जातो. पण, प्लास्टिकमुळे घरात नकारात्मकता वाढत जाते. त्यामुळे घर सजवण्यासाठी प्लास्टिकच्या फूलांचा वापर करणे टाळायला हवे.
मुखवटे –
घरात शिकार केलेले प्राण्यांचे मुखवटे लावणे टाळा. याशिवाय हिंस्त्र प्राण्यांचे चेहरे, फोटो लावल्याने घरात अशांतता पसरते. त्यामुळे असे चेहरे घरात लावू नयेत.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde