Tuesday, May 21, 2024
घरमानिनीFashionSkin Care Tips : या भाज्यांच्या सालांमुळे मिळते त्वचेला चमक

Skin Care Tips : या भाज्यांच्या सालांमुळे मिळते त्वचेला चमक

Subscribe

चांगल्या आरोग्यासाठी आपण सर्वजण नियमितपणे फळं आणि भाज्यांचे (fruits and vegetables) सेवन करतो. पण हीच फळ व भाज्या आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. कसं ते माहीत आहे का? फळ आणि भाज्यांच्या सालीचा (vegetable peels) वापर त्वचेवर चमक आणण्यासाठी केला जाऊ शकतो.

फळे किंवा भाज्यांइतकेच पौष्टिक साले देखील असतात. हे पोषक तत्व विशेषतः त्वचा आणि केसांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. कोणत्या फळाची किंवा भाजीची साल कशी वापरता येईल हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. पण चेहऱ्यावर किंवा केसांवर कोणतीही साल लावण्यापूर्वी त्याचा योग्य वापर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

- Advertisement -

बटाट्याचे साल

तुम्ही चेहऱ्यावर बटाट्याचे साल वापरू शकता. यामुळे त्वचेचा टोन सुधारू शकतो. यासाठी बटाट्याचे सालं काढून ते वाळवून बारीक करावे व त्यात थोडी चंदन पावडर मिसळावी. नंतर त्यामध्ये थोडं गुलाब पाणी आणि कोरफड जेल मिक्स करून चेहऱ्याला लावावे. याचा त्वचेला खूप फायदा मिळतो आणि काळेपणाही दूर होतो.

डाळिंब

त्वचेसाठी डाळिंबाची साल उत्कृष्ट स्क्रबचे काम करते. त्यांना वाळवून बारीक करून घ्या आणि जेव्हा तुम्हाला त्वचा स्क्रब करायची असेल तेव्हा कोणत्याही तेलाचे थेंब मिसळा आणि चेहरा स्क्रब करा. यानंतर येणारी चमक तुम्ही स्वतःच लक्षात घेऊ शकाल.

- Advertisement -

लिंबूची साल

लिंबाची साल ही चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. संत्र्याप्रमाणेच लिंबाच्या सालीमध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते वाळवून पावडर बनवा. पावडरने चेहरा स्क्रब करा किंवा पेस्ट बनवून लावा.

हेही वाचा : Curd Benefits For Skin: उन्हाळ्यात त्वचेसाठी बेस्ट आहे दही फेसपॅक

काकडीचे साल

काकडीचे सालही त्वचेसाठी खूप चांगली ठरते. यासाठी तुम्ही काकडीची साले थेट चेहऱ्यावर चोळू शकता. याशिवाय तुम्ही ही साले सुकवून फेस पॅक म्हणूनही वापरू शकता. ते तुमच्या त्वचेला पोषण आणि आर्द्रता देऊ शकते.

संत्र्याचे साल

संत्र्याच्या सालीचा वापर करून तुम्ही त्वचेवर चमक आणू शकता. यासाठी संत्र्याची काही साले उन्हात वाळवल्यानंतर ती चांगली बारीक करून पावडर तयार करा. आता ही पावडर तुमच्या फेस पॅकमध्ये मिसळा आणि चेहऱ्याला लावा. यामुळे तुमची त्वचा सुधारेल.

भाज्या आणि फळांच्या सालीचा तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो. पण तुम्हाला कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर तज्ञांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा : Hair Serum : खोबरेल तेल अन् एलोवेरा जेलने तयार करा हेअर सिरम

_______________________________________________________________________

Edited By : Nikita Shinde

- Advertisment -

Manini