‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटात हृतिक रोशनला खोल समुद्रात डुबकी मारल्यानंतर किती वेगळा अनुभव मिळतो हे तुम्ही पाहिलंच असेल. असाच काहीसा अनुभव बेंगळुरूची क्यानादेखील घेत आहे. जिने वयाच्या १२व्या वर्षीच समुद्र जिंकला आहे. क्याना ही जगातील सर्वात तरुण स्कूबा डायवर आहे. क्याना खरे जेव्हा ऑक्सिजन सिलेंडर आणि स्कूबा गियर घालून आत्मविश्वासाने समुद्रात उडी मारते तेव्हा एक वेगळंच विश्व अनुभवते. तिच्यासाठी सर्व काही वेगळे आहे आणि समुद्राखालील जग त्यांच्या ओळखीचा एक भाग आहे.
क्याना गेल्या दोन वर्षांपासून स्कूबा डायविंग शिकत आहे. 10 वर्षांची असताना तिने अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये डाइव केलं आहे. तिने जेव्हा पहिल्यांदा डाइव केलं तेव्हा तिने एक वेगळाच थरार अनुभवला होता. तिने स्कूबा डायविंग शिकायला सुरुवात केल्यानंतर बालीमध्ये स्कूबा डायविंगचा अॅडव्हान्स कोर्स केला आहे. यानंतर तिने थायलंडमध्ये अॅडव्हान्स ओपन वॉटर कोर्सदेखील केला. यानंतर क्याना अंदमान आणि निकोबार बेटांवरची मास्टर डायवर बनली.
क्यानाकडे केवळ अॅडव्हान्स ओपन वॉटर डायविंगच नाही तर अनेक सर्टिफिकेटस आहेत. तिने अंडरवॉटर फोटोग्राफी, नाइट्रॉक्स डाइविंग, परफेक्ट बॉयंसी कंट्रोल, रेस्क्यू डाइवर ट्रेनिंग सहित अनेक कोर्स केले आहेत. ज्यामुळेच ती वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच या सगळ्या प्रकारात मास्टर बनू शकली आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या या कामाच्या प्रेरणेबद्दल सांगितलं, क्याना म्हणाली, स्कूबा डायविंगमध्ये खूपच मजा आणि रोमांच भरलेला आहे. पाणी म्हणजे माझ्यासाठी दुसरं घर आहे. पाण्याखालील दुनिया भरपूर वेगळी आहे आणि शांतही आहे. मी तिथे रिलॅक्स करु शकते. पाण्यातले मासे तुमचं काहीच बिघडवू शकत नाही जर तुम्ही त्यांना छेडलं नाही तर” क्यानाने असंही म्हटलं की पाण्याखालची दुनिया जितकी शांत आहे तितकीच ती घाबरवणारीदेखील आहे. क्यानाला सगळ्यात भयानक अनुभव अंदमान बेटावर आला होता.
अंदमान निकोबार बेटांवरील पाणी इतकं शांत नव्हतं आणि वातावरणही खराब होतं. तिला वादळातून पाण्याच्या आत जायचं होतं आणि एका बेशुद्धावस्थेतल्या डायवरला नावेपर्यंत घेऊन यायचं होतं. नाव त्यांच्यापासून 20 मीटर दूर होती आणि हे काम सोप्पं नक्कीच नव्हतं. पाण्याखाली आपली अवस्था आणखी खराब झालेली असते.
क्यानाचं म्हणणं आहे की स्कूबा डायविंग ही सोपी गोष्ट नाही. त्यात आपल्याला धोके निर्माण होऊ शकतात. पाण्याखालील दुनिया जितकी सुंदर आहे तितकीच ती खतरनाकदेखील आहे. अशा परिस्ठितीत क्यानाच्या बहादुरीचं कौतुक करायलाच हवं!