सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे. हल्ली विविध ठिकाणी लग्नसमारंभ, साखरपुडे, हळदी अशा कार्यक्रमांना सुरुवात झाली असून. अशा महत्वाच्या कार्यक्रमांना आपलं उपस्थित राहणं देखील अत्यंत गरजेचं आहे. या खास प्रसंगाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र येत या कार्यक्रमात आपलं प्रेसेंझेटेबल आणि स्टायलिश असणं देखील अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, लग्नाच्या सिझनसाठी तरुणींकरता कोणते आउटफिट आहेत उत्तम.
ब्लॅक ड्रेस
तुम्ही हा ब्लॅक ड्रेस रेसीपशनला घालू शकता आणि अशनूर कौरच्या ड्रेसची आयडिया घेऊ शकता. तुम्ही यावर शायनी ओढणी घेऊ शकता. जर फंक्शन रात्री असेल तर हा ब्लॅक ड्रेस अजून सुंदर दिसेल.
एथनिक
तुम्हाला काही एथनिक स्टाइल करायचा असेल तर तुम्ही अवनीत कोरच्या ड्रेसची आयडिया घेऊ शकता. या अभिनेत्रीने ब्लैक कलरचा बैकलेस गाउन कैरी केला आहे. ज्यावर पेस्टल कलर कॉम्बिनेशन आणि एंब्रॉयडरी वर्क आहे.
मल्टी कलर
जर तुम्हाला काही मल्टी कलरमध्ये ट्राय करायचा असेल तर तुम्ही अनुष्का शर्मा प्रमाणे हा मल्टी कलर ड्रेस घालू शकता. मल्टी कलर ड्रेसमध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी आणि पैर्टन्स मिळतील. या मल्टी कलर ड्रेसमध्ये तुम्हाला ऑफ शोल्डर पॅर्टन देखील मिळेल.
प्लाझो ड्रेस
तुम्ही जैस्मीन भसीन सारखा गोटा वर्क अनारकली ड्रेस निश्चितपणे घालू शकता. हा ड्रेस लग्नासाठी उत्तम आहे. तुम्ही यावर तुमच्या पसंतीनुसार ज्वेलरी स्टाइल करू शकता. तुमचा हा लूक खूप एलिगंट दिसेल.
पिंक ड्रेस
सध्या पिंक ड्रेस खूप ट्रेंडमध्ये आहे. हा रंग प्रत्येक मुलीवर शोभून दिसतो. तुम्ही अदिती राव सारखं ड्रेस लग्नाला किंवा कोणत्याही खास प्रसंगी हा ड्रेस घालू शकता. हा पिंक ड्रेस खूप सुंदर दिसेल.
रेड ड्रेस
तुम्ही करीना कपूर सारखा हा रेड ड्रेस घालू शकता हा ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक वाटेल. तरुण मुलींवर असे ड्रेस खूप शोभून दिसतात.
हेही वाचा : Bridal Fashion : हे ब्राइडल ब्लाउज करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar