Saturday, April 20, 2024
घरमानिनीRelationshipParenting Tips:पालकांनी फॉलो करायलाच हव्यात या गोष्टी

Parenting Tips:पालकांनी फॉलो करायलाच हव्यात या गोष्टी

Subscribe

मुलांना सांभाळणं त्यांना वाढवणं, सुसंस्कारी करणं हे काही सहज सोपं काम नाही. मुलं लहान असो वा मोठे आई वडिलांसाठी ते कायम लहानचं असतात. मात्र बऱ्याचवेळा याच प्रेमाचा मुलांकडून गैरफायदा घेतला जातो. मुलं चुकीचं वागायला लागतात. आपल्या पालकांचा आपल्यावर विश्वास आहे याचाच विचार करून मुल वाटेल तशी वागायला लागतात. याला कारण आहे पालकांनी मुलांचे केलेले अतिलाड. त्यामुळे मुलं पालकांना गृहीत धरायला लागतात. पालकांच्या नको तेवढ्या लाडामुळे मुलांवर त्यांची जरब राहत नाही. यामुळे मुलांवर कितीही प्रेम असले तरी योग्य वयात त्यांना शिस्त लावणे हे पालकांचे पहीले कर्तव्य आहे. त्यासाठी मुलांना न आरडा ओरडा करता न रागावता आणि प्रसंगी दरडावताही यायलं हवं. असे पालक गुड पॅरेंटींगचे उत्तम उदाहरण असतात.

- Advertisement -

मुलांना समजून घ्या आणि मगच मार्गदर्शन करा

या जगात मुलांना आईवडिलांपेक्षा कोणीही जास्त ओळखू शकत नाही. कारण मुलांची जडणघडणचं त्यांच्या सहवासात झालेली असते. यामुळे कोणत्या क्षणी आपलं मूलं काय करेल हे आईवडिलांनाच माहित असतं. यामुळे मुलांचा कल आईवडिलांना अधिक कळतो. त्यामुळे जर तुमच मुलं समजूतदार असेल तरच त्याला समजवण्याचा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. पण जर मुलं नको तेवढ्या लाडामुळे हट्टी, तापट, हेकेखोर झालेले असेल तर त्यावर न चिडता त्याला शांत करण्याचां प्रयत्न पालकांनी करावा. कारण अशा मुलांना त्यांच्याच भाषेत समजावणे मार्गदर्शन करणे म्हणजे त्यांना चिडवण्यासारखे आहे.

- Advertisement -

मुलांना स्वातंत्र्य द्या

मुलांना परावलंबी न करता स्वतची कामे स्वत करायला शिकवा. त्यामुळे तुमची मुलं सक्षम तर होतीलच पण त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगाचा ते सामना करू शकतील. यामुळे मुलांना लहानपणापासूनच त्यांची कामे त्यांनाच करायला लावावीत.

नकार पचवायला शिकवणे

हल्लीच्या पिढीला नकार पचवता येत नाही. यामुळे बऱ्याचेवळा अशी मुलं नैराश्यात जातात. मानसिक आजाराला बळी पडतात. त्यातून मग टोकाचे पाऊल उचलतात यामुळे पालकांनी मुलांबरोबर संवाद वाढवायला हवा. नकार कसा पचवायचा हे त्यांना समजावून हसत खेळत सांगायला हवे. त्यामुळे मुलं जगातील स्पर्धांशी लढू शकतील.

 

- Advertisment -

Manini