शरीराला, कपडयांना घामाची दुर्गंधी येवू नये यासाठी खरं तर परफ्युम किंवा अत्तर वापरले जाते. कारण सुंगध हा मनाला आनंद तर देतोच शिवाय मूडही फ्रेश ठेवतो. त्याचबरोबर तुमच्या सुगंधावरून आजूबाजूला वावरणाऱ्यांना तुमची पर्सनिलिटी, चॉईसही कळत असते. यामुळे हल्लीच्या काळात परफ्युम हा स्टेट्स सिंबॉल झाला आहे. यामुळे बरेचजण महागडा परफ्युम दीर्घकाळ टिकेल असे समजून हजारो रुपये खर्च करतात. पण काही तासांनतर परफ्युमचा सुंगंध गायब होतो आणि कपड्यातून घामाची दुर्गंधी येऊ लागते. मग आपण पुन्हा परफ्युम स्प्रे करतो. यात कधी कधी परफ्युमची अख्खी बाटली केव्हा संपते तेच कळत नाही. पण काही अशा युक्त्या आहेत ज्या वापरल्याने परफ्युमचा सुगंध बराच काळ टिकतो.
आपण ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठल्या पार्टीला जाताना पूर्ण तयार झाल्यानंतर कपड्यांवर परफ्यूम फवारतो. पण खरं तर असे न करता आंघोळ झाल्यानंतर परफ्युम फवारावा. त्यामुळे अधिक फ्रेश वाटते. तसेच परफ्यूमही जास्त काळ टिकतो.
परफ्यूमचा सुगंध जास्त काळ टिकवून ठेवायचा असेल तर तो पल्स पॉइंट्सवर ,मनगटावर, कानाच्या मागे किंवा मानेवर परफ्यूम लावावा. असे केल्याने त्याचा सुगंध संपूर्ण शरीरात पसरतो आणि बराच काळ टिकतो.
कोरड्या त्वचेवर सुगंध जास्त काळ टिकत नाही. परफ्यूम लावण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे. मॉइश्चरायझर शरीरातील परफ्यूम दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करते.
काहीजण हातावर परफ्युम स्प्रे करतात आणि दुसऱ्या हाताने ते पसरवतात. पण असे न करता आंघोळ झाल्यावर लगेचच पल्स पॉईंटवर स्प्रे करावा. तो ड्राय झाल्यानंतर तयारी करावी. त्यामुळे सुगंध बराच वेळ टिकतो.