घरात सतत वादविवाद, भांडणे, कुटूंबातील व्यक्तींची अधोगती, दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आर्थिक अडचणी यामागे वास्तूदोष असल्याचे बोलले जाते. वास्तूशास्त्रानुसार एखाद्या घरात वास्तूदोष असेल तर या समस्या जाणवतात. दुसरीकडे, जर एखाद्याच्या घरात वास्तूदोष नसेल तर घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर असतो. घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे सुख-शांती नांदून प्रगतीतील अडथळे दूर होतात. पण, शास्त्रात सांगण्यात आलेले उपाय केल्यास घरातील वास्तूदोष सहज दूर करता येतो. चला तर मग जाणून घेऊयात, वास्तूदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत.
वास्तूदोष दूर करणारे उपाय –
- वास्तूदोष दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे घरात झाडे लावावी. घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी घरात तुळस, मनी प्लांट, कडूलिंबाचे रोप लावावे.
- ज्या घरात स्वच्छता असते तेथेच लक्ष्मी देवीचा वास असतो, असे म्हणतात. त्यामुळे घराची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे.
- घरात पूजा झाल्यावर शंख वाजवावा किंवा नित्यनेमाने पूजा करावी. यामुळे घरातील वास्तूदोष दूर होतो.
- दिवसातून दोन वेळा देवपूजा करावी. देवपूजा करताना कापूर जाळावा. घरात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो. सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढल्याने वास्तूदोष कमी होण्यास मदत मिळते.
- ज्या घरांमध्ये पूजा करताना घंटानाद केला जातो, तेथे वास्तूदोष निर्माण होत नाही. त्यामुळे घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी पूजा करताना घंटा वाजवावी.
- घराच्या मुख्यद्वारावर स्वस्तिक काढल्याने वास्तूदोष दूर होतो, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे.
- घरात कोळ्याचे जाळे होऊन देऊ नये.
- घरात कोणत्याही अनुपयोग वस्तू ठेवू नयेत.
- बेडसमोर चुकूनही आरसा ठेवू नये. बेडसमोर आरसा असल्यास झाकून ठेवावा.
- दररोज उंबरठ्याची पूजा करावी.
हेही पाहा –