Prepare time: 10 min
Cook: 20
Ready in: 30 min
Ingredients
- 1 वाटी रवा
- 2 मध्यम टोमॅटो (बारीक चिरलेले)
- 1 लहान कांदा (बारीक चिरलेला)
- 2 हिरव्या मिरच्या (चिरून)
- 1 ते 2 चमचे मोहरी
- 1 ते 2 चमचे जिरं
- 5-6 कढीपत्ताची पाने
- 1 ते 2 चमचे हळद
- 2 वाटी गरम पाणी
- मीठ चवीनुसार
- 1 चमचा लिंबाचा रस
- कोथिंबीर
Directions
- कढईत मध्यम आचेवर रवा हलक्या गुलाबीसर होईपर्यंत भाजून घ्या. बाजूला ठेवा.
- एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घाला.
- मोहरी तडतडल्यावर चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
- त्यात चिरलेले टोमॅटो, हळद, मीठ आणि साखर घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परता.
- तयार मिश्रणात 2 कप गरम पाणी घालून उकळी येऊ द्या.
- हळूहळू भाजलेला रवा टाकत सतत हलवत राहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
- झाकण ठेवून 3-4 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. गॅस बंद करून त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला.
- गरमागरम टोमॅटो उपमा तयार आहे.