Prepare time: 10 min
Cook: 40 min
Ready in: 50 min
Ingredients
- उभी चिरलेली कच्ची केळी - 2
- उभे चिरलेले बटाटे - 2
- चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा - 2 ते 3
- चिरलेले कारले - 1
- उभे चिरलेले बीट - 1
- उभी चिरलेली वांगी - 2
- उडीद डाळीचे सांडगे - 8 ते 10
- भाजलेली जिरे पावडर - अर्धा चमचा
- तूप - 1 चमचा
- नारळाचे दूध - अर्धी वाटी
Directions
- सर्व भाज्या व्यवस्थित धुवून चिरून घ्या. कढई गरम करून त्यात थोडेसे मीठ टाकून कारले परतून घ्या.
- शेवग्याच्या शेंगा सोडून सर्व भाज्या तेल आणि मीठ टाकून मध्यम आचेवर परतून घ्याव्यात. थोडं मीठ टाकून शेंगा 2 ते 3 मिनिटांकरता वेगळ्या परतून घ्याव्यात. सांडगेही तेलावर परतून घ्यावेत.
- आता एका कढईत कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, जिरे यांची फोडणी द्या. आता यात सगळ्या परतलेल्या भाज्या टाकून नीट शिजवून घ्या.
- 3 ते 4 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर त्यात ठेचलेले आले टाकावे आणि दोन वाट्या पाणी टाकून शिजवून घ्यावे.
- भाजी चांगली शिजली की त्यात चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, परतलेले सांडगे ,कारले, नारळाचे दूध टाकावे आणि 5 ते 7 मिनिटांकरता उकळी येईपर्यंत शिजू द्यावे.
- यानंतर भाजलेली जिरे पावडर, एक चमचा तूप टाकावे आणि गॅस बंद करावा.
- हे शुक्तो तुम्ही भात किंवा पोळी, भाकरीसोबत खाऊ शकता.