Prepare time: 10 min
Cook: 20 min
Ready in: 30 min
Ingredients
- साबुदाणा - 1 वाटी
- तूप - 6 ते 8 टेबलस्पून
- वेलची - 5 ते 7
- बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स - आवडीनुसार
- सुकं खोबरं - 3/4 वाटी
- पिठीसाखर - अर्धी वाटी किंवा गूळ - अर्धी वाटी
Directions
- साबुदाणा सोनेरी रंगाचा होईपर्यंत तव्यावर भाजून घ्या.
- आता वेलची व साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. जर तुम्ही गूळ वापरणार असाल तर तोही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
- आता एका कढईत खोबरं 2 ते 3 मिनिटांसाठी हलकेच भाजून घ्यावे.
- एका पसरट भांड्यात बारीक केलेल्या साबुदाण्याचे मिश्रण, गूळ किंवा पिठीसाखर आणि भाजलेलं खोबरं एकत्र करून घ्यावं
- तव्यात तूप गरम करून त्यात हे सगळं मिश्रण टाकावं, यात बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकावेत आणि मिश्रण एकजीव करून घ्यावं.
- मोदक बांधण्याइतके मिश्रण मऊ झाले की मोदकाच्या साच्याला तूपाचे बोट लावून त्यात मिश्रण गच्च भरून मोदक तयार करावेत.