सगळीकडे आता थंडीला सुरुवात झालेली असून या दिवसात आपण आपल्या आरोग्यसह फॅशची देखील दक्षता घेतो. फॅशनसाठी योग्य कपड्यांची निवड करणे देखील अत्यंत गरजेचं आहे. या दिवसात थंडी जास्त असल्यामुळे आपण बऱ्याचदा उबदार कपडे घालतो . थंडी सुरु झाली की लग्नाचा सीझन देखील सुरु होतो. त्यामुळे आपल्याला पार्टीला किंवा लग्नाला जावे लागते. बऱ्याचदा थंडी जास्त असल्यामुळे साडी किंवा सूटवर आपण स्वेटर ट्राय करतो. साडी किंवा सूटवर स्वेटर शोभून दिसत नाही. संपूर्ण लूक देखील खराब दिसतो.
तुम्हाला काही हटके आणि स्टयलिश लूक पाहिजे असेल तर तुम्ही स्वेटर ऐवजी श्रग ट्राय करू शकता. तुमचा हा लूक खूप सुंदर आणि परिपूर्ण दिसेल. आज आपण जाणून घेऊयात साडीसह कोणते श्रग ट्राय करू शकतो.
साडीसह श्रग कसं स्टाइल करायचं
- तुम्ही साडीवर कॉन्ट्रास्ट श्रग स्टाइल करू शकता.
- सिल्क किंवा जॉर्जेट साडीसोबत लाँग श्रग एलिगंट दिसतो.
- नेट किंवा लेस मटेरियलचे श्रग हे पार्टी लूकसाठी चांगले दिसतात.
- सिल्क साडीसोबत याचा कॉन्ट्रास्ट रंग चांगला दिसतो.
- पेस्टल साडीवर ग्लिटर असलेले श्रग जास्त उठून दिसतील
- श्रगला ओपन ठेवून साडीचा पदर व्यवस्थित दिसू द्या.
- हैवी साडीसह हलक्या डिझाईनचा श्रग निवडा.
हे श्रग साडीसह करा ट्राय
लाँग श्रग
साध्या किंवा प्रिंटेड साडीवर तुम्ही लाँग श्रग परिधान करू शकता. तुम्ही हे कॉन्ट्रास्ट देखील स्टाइल करू शकता.
सीक्विन वर्क श्रग
साडीसह तुम्ही हे सीक्विन वर्क श्रग स्टाइल करू शकता. या श्रगला स्टाइल केल्यानंतर तुम्हाला एक हटके लूक मिळेल. या श्रगमध्ये तुमहाला वर्क किंवा साधे पार्टन्स देखील मिळतील. याची किंमत तुम्हला बाजारात किंवा ऑनलाइन 2,000 रुपयांना मिळेल. या श्रगमध्ये तुम्हाला रॉयल लूक देखील मिळेल. तुम्ही तुमच्या साडीच्या अनुषंगाने स्टाइल करू शकता.
लेस वर्क श्रग
रॉयल लूकसाठी तुम्ही हा लूक करू शकता. या लूकमध्ये तुम्ही खूप स्टयलिश आणि सुंदर दिसाल. या प्रकारचा श्रग तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी 1,000 रुपयांना मिळेल.
अशाप्रकारे तुम्ही परिपूर्ण लूकसाठी साडीवर हे श्रग ट्राय करू शकता.
हेही वाचा : Winter Fashion Tips : जुनं स्वेटर दिसेल नवं
Edited By : Prachi Manjrekar