Saturday, January 11, 2025
HomeमानिनीFashionFashion Tips : ऑफिसच्या पार्टीसाठी अभिनेत्रींच्या या आऊटफिट आयडियास करा ट्राय

Fashion Tips : ऑफिसच्या पार्टीसाठी अभिनेत्रींच्या या आऊटफिट आयडियास करा ट्राय

Subscribe

ख्रिसमच्या निमित्ताने अनेक ऑफिसेसमध्ये काही खास कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते. या खास प्रसंगी आपलं प्रेजेंटेबल आणि सोफिस्टिकेटेड असणे अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण अशा कार्यक्रमांमध्ये रेड ग्रीन किंवा तेचतेच आऊटफिटस घालतो. जर तुम्हाला यावर्षी काही आकर्षक आणि हटके घालायचं असेल तर तुम्ही अभिनेत्रींच्या काही आऊटफिट आयडियास ट्राय करू शकता. या आयडियामुळे तुम्हाला आऊटफिटची निवड करणे सोपे होईल. आज आपण जाणून घेऊयात ऑफिस पार्टीसाठी कोणत्या आऊटफिट आयडियास आपण ट्राय करू शकतो.

मेटॅलिक लूक

हटके लूकसाठी तुम्ही गोल्ड, सिल्वर, किंवा रोझ गोल्डसारखे मेटॅलिक टच असलेले ड्रेसेस किंवा साड्या तुम्ही ट्राय करू शकता.

- Advertisement -

ट्रेंडी को-ऑर्ड सेट

 तुम्ही अभिनेत्रीं सारखे ट्रेंडी को-ऑर्ड सेट देखील घालू शकता. या आऊटफिटमुळे तुमचा लूक खूप आकर्षक दिसेल.

बोल्ड ब्लॅक ड्रेस

ख्रिसमसाठी बोल्ड ब्लॅक ड्रेस उत्तम आहे. या ड्रेसमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील.

- Advertisement -

जान्हवी कपूरचा स्कर्ट-टॉप

जान्हवी कपूरचे प्रत्येक आऊटफिट हे सुंदर आणि आकर्षक असतात. तुम्ही तिच्या काही आऊटफिटच्या आयडियास घेऊ शकता. जान्हवी कपूरचा हा स्कर्ट-टॉप ख्रिसमसच्या थिमसाठी उत्तम आहे.

तमन्ना भाटिया वेलवेट प्रिंट गाउन

विंटर किंवा ख्रिसमस पार्टीसाठी तमन्ना भाटियाचा हा वेलवेट प्रिंट गाउन उत्तम आहे. हे पार्टीमध्ये तुम्ही सहजपणे कॅरी करू शकता. या आऊटफिटसह तुम्ही फंकी गोल्डन ब्रेसलेट आणि कानातले पण कॅरी करू शकता.

मानुषी छिल्लर रेड ड्रेस 

मिस वर्ल्ड आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मानुषी छिल्लर ही नेहमीच चर्चेत असते. आता तिचा रेड ड्रेस सध्या खूप चर्चेत आहे. तुम्ही ऑफिसच्या पार्टीसाठी तिचा हा सुंदर ड्रेस ट्राय निश्चितपणे करू शकता.

आलिया भट्ट 

आजकालच्या तरुणींना भुरळ पाडणारी आलिया भट्ट ही नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅशनसेन्स खूप कमाल असून तुम्ही तिच्या काही आयडियास घेऊ शकता. तिचे आऊटफिटस पार्टीसाठी उत्तम आहे.

हेही वाचा : Christmas Fashion Tips : ख्रिसमसला हे मॅक्सी ड्रेस करा ट्राय


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini