दिवाळीनंतर आता सगळीकडे लग्नाचा सिजन सुरु झाला आहे. प्रत्येक दुकानात आपल्याला लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळते. कपड्यांची दुकाने, दागिन्यांचे शोरूम, आणि डेकोरेशनची दुकाने सगळीकडे ग्राहकांची गर्दी असते. लग्नात आऊटफिट मेकअपसह तुमचा लूक परिपूर्ण आणि आकर्षक बनवण्यासाठी दागिने देखील खूप महत्वाचा भाग आहे. या दागिन्यांशिवाय तुमचा संपूर्ण लूक हा अपूर्ण आहे. दागिण्यांमुळे आपल्या लूकची अजून शोभा वाढते. आपण अधिक सुंदर दिसतो. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही आपल्या आऊटफिटवर कोणता हार जास्त शोभून दिसेल तसेच लग्नाचा लूक तुम्हाला हटके करायचा असेल तर तुम्ही लग्नासाठी राणी हाराची निवड करू शकता. आज आपण जाणून घेऊयात, लग्नासाठी कोणत्या राणी हाराची निवड आपण करू शकतो .
कुंदन वर्क रानी हार
जर तुम्ही लग्नात सिल्कची किंवा हैवी साडी नेसत असाल तर तुम्ही हा कुंदन वर्क रानी हार घालू शकता. हा हार घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो. या राणी हारमध्ये तुम्हाला थरांसह कुंदन वर्क आणि लहान कानातले मिळतील. या राणी हारामुळे साडीला देखील सुंदर लूक मिळेल. तुमच्या पसंतीनुसार तुम्हाला कुंदन वर्क सहजपणे मिळतील. याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीचा रंगही निवडू शकता. जर तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरी पाहिजे असेल तर बाजारात सहजपणे तुम्हाला आर्टिफिशियल ज्वेलरी डिझाईन्स मिळतील.
स्टोन वर्क वाला रानी हार
तुम्हाला सिंम्पल आणि रॉयल लूक पाहिजे असेल तर तुम्ही या राणी हाराची निवड करू शकता. स्टोन वर्क राणी हार हा तुमच्या सिंम्पल लूकला रॉयल टच देईल. या स्टोन वर्क राणी हारासह तुम्हाला मॅचिंग कानातले आणि मांग टीका देखील मिळेल.
गोल्ड डिझाइन रानी हार
तुम्ही तुमच्या लग्नाच्या सुंदर साडी सोबत हा गोल्ड डिझाइन रानी हार स्टाइल करू शकता. यासाठी तुम्ही लेयर नेकलेस सेट स्टाईल करू शकता. यामध्ये तुम्हाला राणी हाराचे अनेक थर पाहायला मिळतील. यामुळे हा नेकलेस आणखीनच सुंदर दिसेल.हा लूक अजून आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही यावर झुमके आणि मांग टिक्काही स्टाइल करू शकता. या राणी हारामुळे तुम्हाला रॉयल लूक मिळेल.
हेही वाचा : Bridal Look Ideas : नववधूकडे असायलाच हवेत हे ट्रेंडी ड्रेसेस
Edited By : Prachi Manjrekar