Tuesday, January 21, 2025
HomeमानिनीFashionBeauty Tips : सोनम कपूरचे हे ब्यूटी हॅक्स करा ट्राय

Beauty Tips : सोनम कपूरचे हे ब्यूटी हॅक्स करा ट्राय

Subscribe

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर ही एक चांगली अभिनेत्री असून ती एक स्टयलिश देखील आहे. तिला ग्लॅमरस आणि दिवा देखील म्हटले जाते. तिचे प्रत्येक ऑउटफिट हे खूप सुंदर आणि आकर्षक असतात. अभिनय कौशल्याबरोबरच तिच्या स्टाइल आणि फॅशन सेन्ससाठी तिला ओळखले जाते. ती एक ट्रेंडसेटर सुद्धा आहे. तिची फॅशन, तिची स्टाइल ब्यूटी टिप्स लोक मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे इंस्टावर तिचे खूप फॉलोवर्स देखील आहे. तसेच ती इंस्टाग्रामवर ब्यूटी हॅक्स देखील सांगत असते. आज आपण जाणून घेऊयात, सोनम कपूरचे काही ब्यूटी हॅक्स

सोनम कपूरचे ब्यूटी हॅक्स अनेक महिलांना आवडतात. यामागचं कारण म्हणजे ती नेहमीच एलिगंट आणि सुंदर दिसते. ती मेकअपशिवाय देखील खूप चांगली दिसते. आज आपण तिच्या काही लोकप्रिय ब्यूटी हॅक्स बद्दल जाणून घेऊयात.

त्वचेची काळजी

 सोनम त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते, खूप हायड्रेट राहते. दिवसांतून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे खूप आवश्यक आहे. पाण्यामुळे आपली त्वचा अधिक चमकदार बनते, त्वचेवरील छिद्रे देखील निघून जातात.

मेकअप टिप्स

मेकअप करण्यापूर्वी त्वचा फेसवॉशने नीट धुवून घ्या. त्यानंतर चेहरा मॉईशराइज करून प्राइमर लावा. न्यूड किंवा मॅट लिपस्टिक शेड्स देखील तुम्ही वापरू शकता. याने तुमचे ओठ खूप सुंदर दिसतील.

मॉईश्चरायझर

सोनम कपूर नेहमी तिचा चेहरा मॉईश्चरायझ करत असते. चेहरा मॉईश्चरायझ केल्याने चेहरा हायड्रेट राहतो. आपल्या त्वचेसाठी मॉईश्चरायझर खूप महत्वाचे असते.

केसांची काळजी

त्वचेप्रमाणे केसांची काळजी घेणे देखील अंत्यत गरजेचे आहे. त्वचेप्रमाणे केसांचे देखील सिरम येते ते तुम्ही केसांना लावू शकता. याने तुमचे केस मजबूत आणि घट्ट राहतील.

डार्क सर्कल्ससाठी कोरफड जेल वापरणे

डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी तुम्ही त्यावर कोरफड जेल लावू शकता. याने तुमचे डार्क सर्कल्स त्वरित कमी होईल.

सोनम कूपरचे हे ब्यूटी हॅक्स तुम्ही वापरू शकता.

हेही वाचा : Beauty Tips : ब्यूटी टूल्स वापरताना या चुका करू नका


Edited By : Prachi Manjrekar

 

 

 

 

 

Manini