Tuesday, December 10, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionWedding Fashion : रिसेप्शनला या साड्या करा ट्राय

Wedding Fashion : रिसेप्शनला या साड्या करा ट्राय

Subscribe

प्रत्येक महिलेला साडी नेसायला खूप आवडते. साडीमध्ये महिलांचे सौंदर्य अजून खुलून दिसते. या साड्या कोणत्याही प्रसंगी खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. हल्ली साड्यांमध्ये आपल्याला असंख्य प्रकार आणि रंग पाहायला मिळतात. फेस्टिव्ह नंतर आता लग्नाचा सीझन सुरु होतो. या कालावधीमध्ये मार्केटमध्ये साड्यां चे खूप सुंदर आणि आकर्षक डिझाइन्स आणि पॅटन्स आपल्याला पाहायला मिळतात. आता लग्न ,हळदी साखरपुडा इत्यादी कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. आजकाल साड्यांमध्ये असंख्य प्रकार आल्यामुळे बऱ्याचदा महिलांना कळत नाही कोणत्या साडीची निवड करावी. आज आपण जाणून घेऊयात, रिसेप्शनला कोणत्या सुंदर साड्या आपण ट्राय करू शकतो.

ब्लॅक जामदानी लेहंगा

तुम्ही साडी लेहंग्या प्रमाणे स्टाइल करून हा लूक क्रिएट करू शकता. या लूकमध्ये तुम्ही खूप सुंदर आणि आकर्षक दिसालं तुमचा हा लूक रिसेप्शनसाठी बेस्ट आहे .

- Advertisement -

रेड झरी साडी

रेड साडी ही नेहमीच खूप सुंदर आणि आकर्षक वाटते. तुम्ही रिसेप्शनला ही लाल रंगाची साडी नेसू शकता. ही झरीची साडी तुम्हाला सगळीकडे सहजपणे मिळेल.

वाइन साडी

जर रिसेप्शन रात्री किंवा संध्याकाळी असेल तर तुमची ही वाइन साडी खूप सुंदर वाटेल लायटिंगमुळे या साडीची शोभा अजून द्विगुणित होईल.

- Advertisement -

बनारसी साडी

सध्या बनारसी साड्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हल्ली बऱ्याच अभिनेत्री बनारसी साड्या नेसतात. या साड्या खूप रॉयल आणि आकर्षक दिसतात. तुम्ही देखील रिसेप्शनला बनारसी साडी निश्चितपणे नेसू शकता.

या सर्व साड्या रिसेप्शनला तुमच्या लूकची शोभा वाढवेल. आणि या साड्या खूप हटके आणि आकर्षक देखील दिसतात.

हेही वाचा : Bridal Fashion : हे ब्राइडल ब्लाउज करा ट्राय


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini