चेहऱ्याचे सौंदर्य द्विगुणित आणि अजून खुलून दिसण्यासाठी आपण काजळ लावताे. बऱ्याचदा आपण ब्लॅक काजळचा जास्त उपयोग करतो. ब्लॅक काजळमुळे आपले डोळेच नाही तर संपूर्ण लूक देखील आकर्षक दिसतो. पूर्वीच्या काळी काळ्या रंगाचे काजळ उपलब्ध असायचे. परंतु आता विविध शेड्स असलेले काजळ तुम्हाला सहजपणे उपलब्ध मिळतील. तुम्हाला हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणी मिळेल. आज आपण जाणून घेऊयात, काजळाच्या कोणत्या शेड्स आपण ट्राय करू शकतो.
हल्ली काजळाच्या अनेक शेड्स आपल्याला पाहायला मिळतात. या विविध प्रकारच्या शेड्समुळे आपण आपला संपूर्ण लूक हायलाइट करू शकतो. तुम्ही तुमच्या आऊटफीट आणि लूकप्रमाणे या काजळाच्या शेड्सचा वापर करू शकता.
ग्रीन कलर काजळ
जर तुम्हाला कूल लूक पाहिजे असेल तर तुम्ही हे ग्रीन कलर काजळ ट्राय करू शकता. या ग्रीन कलरमध्ये देखील तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. हे काजळ तुम्ही तुमच्या आऊटफिटसह मॅच करू शकता. या काजळचा वापर जास्त करून प्रोफेशनल आर्टिस्ट करतात.
ब्राउन ब्लैक काजळ
ब्राउन काजळ हे खूप आकर्षक लूक देते. जर तुम्हाला काही हटके ट्राय करायचं असेल तर तुम्ही, हे ब्राउन ब्लैक काजळ निश्चितपणे ट्राय करू शकता. जर इंडो-वेस्टर्न लूक क्रिएट करत असाल तर ब्राउन ब्लैक काजळच्या मदतीने तुम्ही हा लूक करू शकता.
ब्लू कलर काजळ
आजकाल बरेच लोक ब्लू काजळचा वापर करतात. तुम्हाला काही युनिक करायचं असेल तर तुम्ही ब्लू कलर काजळ वापरू शकता. हे काजळ वेर्स्टन आणि ट्रेडिशनल दोन्ही ड्रेसवर खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल. तुम्ही बोल्ड लूक करत असाल तर तुमच्यासाठी हे काजळ उत्तम आहे.
हेही वाचा : Winter Beauty Tips : हिवाळ्यात वॅक्सिंग करताना घ्या ही काळजी
Edited By : Prachi Manjrekar