आपण आपल्या आऊटफिट मेकअप आणि हेअरस्टाइलसह ज्चेलरीचा देखील विचार करताे. हा खुप महत्तवाचा भाग आहे. ज्वेलरीशिवाय आपला संपूर्ण लूक हा अपूर्ण आहे. सलवार सूट किंवा कोणत्याही ड्रेससह हे ऑक्सिडाईज्ड झुमके खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. आजकाल ऑक्सिडाईज्ड झुमक्यांमध्ये देखील असंख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार हे ऑक्सिडाईज्ड ट्राय करू शकता.
ऑक्सिडाईज्ड झुमक्यांमुळे आपला संपूर्ण लूक बदलून जातो. तुम्ही तुमच्या ड्रेसच्या अनुषंगाने हे झुमके कॅरी करू शकता. आज आपण जाणून घेऊयात सलवार-सूटसह कोणते ऑक्सिडाईज्ड झुमके आपण ट्राय करू शकतो.
पर्ल ऑक्सिडाईज्ड झुमके
वेडिंग सीझनसाठी पर्ल ऑक्सिडाईज्ड झुमके उत्तम आहेत. जर तुम्हाला काही हटके आणि सुंदर काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे झुमके निश्चितपणे ट्राय करू शकता. तुम्हाला एक एथनिक लूक देखील मिळेल.
फुलांचे झुमके
तुम्ही आलिया भट्टचे हे फुलांचे झुमके ट्राय करू शकता. हे झुमके खूप एलिगंट दिसतात. जर तुमचा चेहरा ब्रॉड असेल तर तुम्ही लहान झुमके ट्राय करू शकता. हे तुमच्या सलवार-सूटसह खूप आकर्षक आणि सुंदर दिसेल. तुम्ही या लूकसह मिनिमल मेकअप आणि हेअरस्टाइल करू शकतात.
चांद बाली झुमके
तुम्ही सलवार सूटसह हे चांद बालीचे झुमके ट्राय करू शकता. चांद बालीचे झुमके हे खूप सुंदर आणि आकर्षक देखील दिसतात. हे झुमके तुम्ही बाजारात किंवा ऑनलाईन दोन्ही ठिकाणी तुम्हाला सहजपणे मिळेल. याची किंमत साधारणपणे ४०० ते ५०० आहे.
हेही वाचा : Fashion Tips : सिम्पल लूकसाठी ट्राय करा गोल्डन हँगिंग इअरिंग्स
Edited By : Prachi Manjrekar