आपण आपल्या पसंतीनुसार फॅशन आणि स्टाइल करतो. हल्लीच्या काळात एका आऊटफिटचे आपल्याला असंख्य प्रकार पाहायला मिळतात. तसेच ब्लेजरमध्ये देखील सध्या असंख्य पार्टन्स आणि रंग मिळतात. परंतु फ्लाॅरल ब्लेजर हल्ली खूप ट्रेंडमध्ये आहे. हे ब्लेजर तुम्ही ऑफिस, पार्टी अशा ठिकाणी घालू शकता. हे फ्लाॅरल ब्लेजर खूप आकर्षक आणि सुंदर दिसतील.हे फ्लोरल ब्लेझर योग्यरित्या स्टाईल करणे देखील अत्यंत गरजेचं आहे. आज आपण जाणून घेऊयात कोणते फ्लाॅरल ब्लेजर आपण ट्राय करू शकतो.
मोनोक्रोम लूक
तुम्ही मोनोक्रोम लूकमध्ये देखील हे फ्लाॅरल ब्लेझर घालू शकता. हे जीन्ससह स्टाइल करू शकता. यासह कोणत्याही प्रकारची ॲक्सेसरीज घालू शकता. यामुळे तुमचा लूक खूप सुंदर आणि परिपूर्ण दिसेल. तुम्ही हे ब्लेजर कोणत्याही प्रसंगी घालू शकता.
सिंम्पल लूक
फ्लाॅरल ब्लेजर हे नेहमीच हटके आणि आकर्षक दिसतात. या ब्लेजरमुळे तुमचा लूक बदलू शकतो तसेच तुम्हाला एक बोल्ड लूक मिळेल. हे ब्लेजर तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या टॉप किंवा शर्टसह सहजपणे जाऊ शकते. तुमचा हा लूक खूप सुंदर आणि सोफॅस्टिकेटेड वाटेल.
फ्लाॅरल प्रिंट्स
काही फ्लाॅरल प्रिंट्स असतात. जसे टोन-ऑन-टोन प्रिंट्स फॉर्मल आणि कॅज्युअल हे दोन्ही प्रकारच्या लूकसाठी उत्तम आहे.
बोल्ड लूक
जर तुम्ही काही बोल्ड आणि हटके काहीतरी ट्राय करत असाल तर ट्रॉपिकल फ्लाॅरल प्रिंट्स ब्लेझर हे उत्तम आहेत. हा लूक तुम्ही कोणत्याही पार्टीला किंवा फंक्शनला ट्राय करू शकता.
फ्लाॅरल ब्लेजर स्टाइल करायचे काही टिप्स
फ्लाॅरल ब्लेजर स्टाइल करताना बऱ्याच गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. हा लूक नीट स्टाइल केलं नाही तर संपूर्ण लूक खराब दिसेल त्यामुळे हा लूक योग्यरीत्या क्रिएट करणे अत्यंत गरजेचं आहे.
- फ्लाॅरल ब्लेजर घालताना सोबर आणि सिंम्पल बेस आउटफिटची निवड करा.
- तुम्ही डेनिमसह पेअर करू शकता .
- मोनोक्रोम लूक करू शकता
- फ्लाॅरल ब्लेजर घालताना स्लिम बेल्टचा वापर करा.
- ज्वेलरी आणि अॅक्सेसरीजवर लक्ष द्या
- अशाप्रकारे तुम्ही हे फ्लाॅरल ब्लेजर स्टाइल करू शकता.
हेही वाचा :Winter Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी या टिप्स करा फॉलो
Edited By : Prachi Manjrekar