ख्रिसमसला आणि न्यू इयर पार्टीला अवघे काही दिवसच राहिलेले आहेत. या पार्टीसाठी आपण प्रत्येक गोष्टीची तयार करतो आपल्या ड्रेस, ज्वेलरी पासून ते मेकअप पर्यत.परंतु तुम्हाला यावर्षी काही हटके आणि स्टयलिश असं काही करायचं असेल तर तुम्ही हा ग्लिटरी आय मेकअप ट्राय करू शकता. बऱ्याचदा आपण मेकअप करतो. पण आय मेकअपकडे दुर्लक्ष करतो. आय मेकअपमुळेच आपला संपूर्ण लूक बदलतो. आपल्याला एक युनिक लूक मिळतो.
आय मेकअप करणे थोडे अवघड असते. जर आयबी मेकअप नीट केलं नाही तर संपूर्ण लूक खराब होत, बऱ्याचदा आपल्याला कळत नाही, आय मेकअप कास करायचं आज आपण जाणून घेऊयात पार्टीसाठी कोणता ग्लिटरी आय मेकअप आपण करू शकतो.
डोळ्यांचा मेकअप कस करायचं
- डोळ्यांच्या आसपासची त्वचा स्वच्छ करा.
- डोळ्यांखाली प्रायमर लावा, ज्यामुळे दीर्घकाळ टिकेल
- जर तुम्हाला डार्क सर्कल्स असतील तर कंन्सिलर वापरा.
- आयशॅडो हा ब्राउन किंवा मरून लावा.
- डोळ्यांच्या वरच्या पापण्यांना आयलाइनर वापरा.
- पार्टीसाठी चमकदार किंवा स्मोकी आयशॅडो खूप सुंदर दिसतील
ग्लिटरी आय मेकअप
मोनोक्रोमेटिक आय मेकअप
शिमरी आय मेकअपमध्ये मोनोक्रोमेटिक आय मेकअप खूप ट्रेंडिंग आहे. हा आय मेकअप करणे अत्यंत सोपे आहे या आय मेकअपशी तुम्ही ड्रेसला कॉन्ट्रास्ट देखील करू शकता. हा आय मेकअप खूप सुंदर आणि क्लासिक दिसेल. या मेकअपसाठी एकच आयशेडो वापरला जातो. यासाठी तुम्ही सर्वात आधी डोळ्यांना प्राइमर आणि कंन्सिलर लावा. यानंतर तुमच्या ड्रेसला मॅच होईल, असे आय शॅडोस लावा. तुम्ही ब्रशच्या मदतीने आय शॅडो लावू शकता. चांगलं ब्लेंड करून घ्या. ब्लेंड करून घेतल्यामुळे डोळ्यांवर पसरणारा देखील नाही. अशाप्रकारे तुम्ही मोनोक्रोमेटिक आय मेकअप करू शकता.
फुल कट क्रीज
फुल कट क्रीज आयमेकअप खूप ट्रेंडमध्ये आहे. या आय मेकअपमुळे तुम्हाला पार्टीला परफेक्ट लूक मिळेल. हा आय मेकअप करण्यासाठी सर्वप्रथम डोळ्यांच्यावर फाउंडेशन आणि कंन्सिलर लावून घ्या. त्यानंतर एक लाइट शेड घेऊन ब्लेंड करून घ्या. या मेकअप साठी तुम्ही थोडे न्यूड शेड्सचा वापर करू शकता. आणि फाउंडेशन बॉर्डर करू शकता.
ग्रेडिएंट आय मेकअप
पार्टीसाठी ग्रेडिएंट आय मेकअप परफेक्ट आहे. हा मेकअप करण्यासाठी तुम्ही डोळयांवर गोल्डन किंवा सिल्वर असे रंग वापरू शकता. दोन रंग मिक्स करू शकता याने तुम्हाला एक परफेक्ट पार्टी लूक मिळेल. हा मेकअप तुमच्या आऊटफिट देखील चांगला दिसेल.
अशाप्रकारे तुम्ही पार्टीला ग्लिटरी आय मेकअप करू शकता
हेही वाचा : Coffee Face mask : कॉफीचे फेसपॅक चेहऱ्यासाठी फायदेशीर
Edited By : Prachi Manjrekar