Sunday, December 15, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionWedding Fashion : हळदी आणि मेंहदीला ट्राय करा ईशा देओलचे हे स्टायलिस्ट...

Wedding Fashion : हळदी आणि मेंहदीला ट्राय करा ईशा देओलचे हे स्टायलिस्ट आऊटफिट

Subscribe

आता सगळीकडे लगीन घाई सुरु झाली आहे. प्रत्येकाच्या कुटूंबात एक तरी लग्न निश्चितच असेल . लग्न सोहळा हा खूप खास आणि महत्वाचा सोहळा असतो. बऱ्याचदा आपण लग्नात तेच तेच कपडे घालतो. परंतु यावर्षी तुम्हाला काही हटके आणि स्टयलिश घालायचं असेल तर तुम्ही ईशा देओलचे काही आउटफिट ट्राय करू शकता. ईशा देओलचे बरेच आऊटफिट हे खूप सुंदर आणि आकर्षक असतात. त्यामुळे तिच्या आऊटफिटची आयडिया तुम्ही घेऊ शकता.

शरारा सूट सेट

हळदी फंक्शनला रॉयल आणि स्टयलिश लूक पाहिजे असेल तर तुम्ही अभिनेत्री, ईशा देओल सारखे शरारा सूट ट्राय करू शकता. या सूटमध्ये तुम्हाला रॉयल आणि बेस्ट लूक देखील मिळेल. येलो शरारा सूटसह पिंक रंगाची ओढणी स्टाइल करा. हा सूट तुम्हाला शक्यतो ऑनलाइन तुमच्या बजेटमध्ये मिळेल.

- Advertisement -

प्लाजो सूट सेट

खास कार्यक्रमा दिवशी तुम्ही प्लाजो सूट सेट देखील घालू शकता. हा सूट खूप सुंदर आणि आकर्षक देखील दिसेल. हा सूट तुम्हाला अनेक रंगात आणि पार्टनमध्ये उपलब्ध होईल.

पेस्टल लेहंगा

हल्ली मोठ्या प्रमाणात पेस्टल रंगाचे कपडे घातले जातात. हा पेस्टल रंग खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. हा पेस्टल रंगाचा लेहंगा तुम्ही मेहंदीला घालू शकता, हा लेहंगा थिमशी जुळणारा देखील आहे.

- Advertisement -

येलो आणि पिंक कलर

हळदीसाठी स्टयलिश आणि सुंदर अशी पिंक आणि येलो साडी नेसू शकता. ही साडी स्टयलिश आणि ट्रेडिशनल दोन्ही वाटेल.

ड्रेस

तुम्ही हळदी किंवा मेहंदीला हा सुंदर ड्रेस घालू शकता. हा ड्रेस खूप आकर्षक आणि स्टयलिश दिसेल.

हेही वाचा :  Best Kajal Colours: काजळच्या या शेड्स करा ट्राय


Edited By : Prachi Manjrekar

 

- Advertisment -

Manini