Friday, January 10, 2025
HomeमानिनीFashionChristmas Fashion Tips : ख्रिसमसला हे मॅक्सी ड्रेस करा ट्राय

Christmas Fashion Tips : ख्रिसमसला हे मॅक्सी ड्रेस करा ट्राय

Subscribe

ख्रिसमस येताच आपल्याला सर्व दुकानांमध्ये लगबग पाहायला मिळते. या दिवसात बाजारात किंवा ऑनलाइन आपल्याला खूप सुंदर असे ड्रेस पाहायला मिळतात. ख्रिसमसच्या दिवसात कपड्याच कलेक्शन काही वेगळंच असतं या दिवसात तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाइन दोन्ही ठिकाणी अनेक पर्याय मिळतील. आपण बऱ्याचदा ख्रिसमसला तेचतेच ड्रेस घालतो. यावर्षी तुम्हाला काही हटके आणि वेगळं ट्राय करायचं असेल तर हे मॅक्सी ड्रेस तुम्ही निश्चितपणे ट्राय करू शकता.

व्हिंटेज ड्रेस

तुम्ही हा सुंदर व्हिंटेज ड्रेस देखील ट्राय करू शकता. आजकाल तुम्हाला बाजारात सहजपणे असे व्हिंटेज ड्रेस मिळतील. या ड्रेसमध्ये तुम्ही ख्रिसमसची थीम असलेल्या ड्रेसची निवड करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक रंग देखील मिळतील.

- Advertisement -

व्हेलवेट मॅक्सी ड्रेस 

व्हेलवेट देखील खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही यामध्ये व्हेलवेट मॅक्सी ड्रेसची निवड करू शकता. योग्य अॅक्सेसरीस घालून तुमचा लूक परिपूर्ण बनवू शकता. लाल, मरुन, नेवी ब्लू हे मॅक्सी ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात.

ग्लिटर मॅक्सी ड्रेस

तुम्ही ग्लिटर मॅक्सी ड्रेसची देखील निवड करू शकता. हा ड्रेस तुमच्या ख्रिसमस पार्टीसाठी देखील उत्तम आहे. या ड्रेसमध्ये गोल्ड, सिल्व्हर किंवा रोझ-गोल्ड असलेले ग्लिटर मॅक्सी ड्रेस सुंदर दिसतात. तुम्ही तुमच्या पंसतीनुसार या ड्रेसची निवड करू शकता .

- Advertisement -

फ्लोरल प्रिंट मॅक्सी ड्रेस

फ्लोरल प्रिंट ड्रेस हे कोणत्याही प्रसंगी खूप सुंदर आणि आकर्षक दिसतात. या ड्रेसमध्ये तुम्हाला अनेक शेड्स डिझाइन्स मिळतील. हा एक उत्तम फेस्टिव्ह ड्रेस आहे.

ऑफ-शोल्डर ड्रेस

तुम्ही लाल किंवा मरून रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस घालून या सणाची शोभा वाढू शकता. हा ड्रेस ख्रिसमसाठी उत्तम आहे.

अॅक्सेसरीज टिप्स

  • गोल्ड किंवा सिल्व्हर ज्वेलरीचा वापर करू शकता.
  • ड्रेससह तुम्ही शॉल, जॅकेट स्टोल इत्यादी स्टाइल करू शकता.
  • हाय हील्स किंवा ग्लिटरसॅंडल मॅक्सी ड्रेससाठी परफेक्ट आहे.

हेही वाचा :  Fashion Tips : ख्रिसमसला हे रेड ड्रेस करा ट्राय


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini