Thursday, January 9, 2025
HomeमानिनीFashionChristmas Party Looks: ख्रिसमस पार्टीला हा परफेक्ट लूक करा ट्राय

Christmas Party Looks: ख्रिसमस पार्टीला हा परफेक्ट लूक करा ट्राय

Subscribe

ख्रिसमस हा सण 25 डिसेंबर रोजी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. आजकाल ऑफिस, शाळा किंवा कॉलेजमध्ये देखील ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले जाते. या दिवसात तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन देखील असंख्य ड्रेस पाहायला मिळतील. जर तुम्हाला यावर्षी काही हटके आणि नवीन काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे ड्रेस निश्चितपणे ट्राय करू शकता.

ख्रिसमसला आपण बऱ्याचदा लाल रंगाचे कपडे परिधान करताे. पण यावर्षी तुम्ही काही हटके ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात, ख्रिसमस पार्टीला कोणता परफेक्ट लूक ट्राय करू शकतो.

- Advertisement -

लॉन्ग ड्रेस

ख्रिसमस पार्टीला बरेच लोक लॉन्ग ड्रेस स्टाइल करतात. लॉन्ग ड्रेसमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील. तसेच तुम्ही स्लिव्हलेस किंवा फूल हॅन्ड असलेले ड्रेस देखील घालू शकता. हे ड्रेस खूप आकर्षक आणि सुंदर दिसतात. याची किंमत साधारणपणे मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन 1००० ते 15०० पर्यत आहे.

शॉर्ट ड्रेस

ख्रिसमस पार्टीसाठी शॉर्ट ड्रेस उत्तम पर्याय आहे. हे ड्रेस तुम्ही ऑफिस पार्टी किंवा कोणत्याही खास प्रसंगी घालू शकता. या शॉर्ट ड्रेसमध्ये तुम्हाला असंख्य रंग आणि पर्टन्स मिळतील.

- Advertisement -

फ्लोरल ड्रेस

तुम्ही फ्लोरल ड्रेस देखील ट्राय करू शकता. हे फ्लोरल ड्रेस सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला यामध्ये सुंदर फ्लोरल डिझाइन्स देखील पाहायला मिळतील.

रेड ड्रेस

ख्रिसमसमध्ये तुम्हाला सगळीकडे रेड ड्रेस पाहायला मिळतील. रेड ड्रेसमध्ये असंख्य प्रकार आणि रंग देखील मिळतील. या दिवसात तुम्हाला स्टयलिश रेड ड्रेसेस पाहायला मिळतील.

अशाप्रकारे तुम्हाला ख्रिसमस पार्टीला परफेक्ट लूक मिळेल.

हेही वाचा : Ready to wear saree fashion : तरुणींना भुरळ घालतोय रेडी टू विअर साड्यांचा ट्रेंड


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini