काही दिवसांनी ख्रिसमस येणार असून आता सगळीकडे ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले जाते. ख्रिसमस हा सण आता सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी घरी केक पासून ते सजावट पर्यत सर्व काही केले जाते. या दिवशी ऑफिस, कॉलेज, घरी काही खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमासाठी आपण बऱ्याचदा तेचतेच कपडे परिधान करतो. परंतु यावर्षी तुम्हाला काही हटके आणि सुंदर असं घालायचं असेल तर तुम्ही हे पोल्का डॉट ड्रेस घालू शकता.
पोल्का डॉट ड्रेस हा खूप उत्तम पर्याय असून हे ड्रेस सध्या खूप ट्रेंडिंग आहेत. हा ड्रेस स्टयलिश आणि एलिगंट देखील दिसतो. तुम्हाला काही सिम्पल आणि सुंदर असं ट्राय करायचं तर तुम्ही हे ड्रेस निश्चितपणे ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात, ख्रिसमस पार्टीला कोणता पोल्का ड्रेस आपण घालू शकतो.
वन शोल्डर पोल्का ड्रेस
तुम्ही ख्रिसमसला आणि पार्टीला या प्रकारचे वन शोल्डर पोल्का ड्रेस घालू शकता. वन शोल्डर पोल्का डॉट ड्रेस हा कोणत्याही पार्टीसाठी उत्तम आहे. या प्रकारच्या ड्रेसमुळे तुम्हाला एक परफेक्ट टच मिळेल. यासह तुम्ही लाल लिपस्टिक लावू शकता किंवा पोनी हेअरस्टाइल करू शकता. तुम्हाला एक स्टयलिश लूक मिळेल. तसेच तुम्ही मेकअप देखील न्यूड ठेवू शकता. या ड्रेससोबत तुम्ही लाल रंगाची हील्स कॅरी करू शकता आणि तुमचा लुक पूर्ण करू शकता.
स्लिट पोल्का ड्रेस
तुम्ही आता याप्रमाणे देखील पोलका ड्रेस घालू शकता. हा पोल्का ड्रेस खूप सुंदर आणि स्टयलिश वाटेल. या ड्रेसला स्लिट असल्यामुळे तुम्हाला एक स्टयलिश लूक मिळेल. हा ड्रेसचा पर्याय देखील तुम्ही ठेवू शकता. या ड्रेसमध्ये तुम्हाला असंख्य पर्याय रंग आणि पॅटन्स मिळतील. या लूकला तुम्हाला वेगळा लूक देण्यासाठी तुम्ही फंकी ज्वेलरी देखील स्टाइल करू शकता. मॅचिंग इरिंग्स सॅंडल घालू शकता.
व्हाइट आणि ब्लॅक पोल्का ड्रेस
या ड्रेसमध्ये तुम्ही व्हाइट आणि ब्लॅक पोल्का ड्रेस निश्चितपणे ट्राय करू शकता. तुम्हाला व्हाइट आणि ब्लॅक मुळे एक रेट्रो लूक मिळेल. हा ड्रेस तुम्हाला ऑनलाइन आणि बाजारात देखील सहजपणे मिळेल. या ड्रेसची किंमत साधरणपणे 1००० ते 2००० पर्यत आहे. या ड्रेसमध्ये तुम्हाला अनेक पॅटन्स देखील मिळतील.
अशाप्रकारे तुम्ही ख्रिसमस पार्टीला किंवा न्यू इयर पार्टीला पोल्का ड्रेस घालू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : पार्टीला हे स्टयलिश आणि बॉडीकॉन ड्रेस करा ट्राय
Edited By : prachi manjrekar