बऱ्याच मुली लग्नाआधी होणाऱ्या फंक्शन्समध्ये साडी किंवा सूट घालतात. हल्ली हे सर्व क्षण आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी प्री वेडिंग शूट केले जाते. आजकाल सोशल मीडियामुळे प्री-वेडिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालेला आहे. प्री वेडिंग शूटला आऊटफिट, मेकअप या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या असतात. या सर्वमुळेच आपले फोटो खूप सुंदर येतात. जर तुम्हाला प्री वेडिंग शूटमध्ये स्टयलिश, हटके आणि रॉयल दिसायच असेल तर तुम्ही लेहंगा ट्राय करू शकता. आज आपण जाणून घेऊयात प्री वेडिंग शूटसाठी कोणते लहंगे ट्राय करू शकतो.
फ्लोरल लेहंगा
हल्ली फ्लोरल लेहंगा खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्हाला फ्लोरल लेहंग्यामध्ये असंख्य प्रकार रंग सहजपणे मिळतील. तुम्ही काही अभिनेत्रींच्या फ्लोरल लेहंग्याची आयडिया घेऊ शकता. प्री वेडिंगसाठी फ्लोरल लेहंगा उत्तम आहे.
मल्टी कलर लेहंगा
तुम्ही शूटसाठी मल्टी कलर लेहंगा घालू शकता. हा लेहंगा खूप सुंदर आणि स्टयलिश देखील वाटेल.
फ्लॉरल एम्ब्रॉयडरी लेहंगा
फ्लॉरल एम्ब्रॉयडरी वर्क लेहंग्यामध्ये तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार हा लेहंगा स्टाइल करू शकता. हा लेहेंगा विशेतः काळ्या रंगात असून या लेहेंग्याच्या ब्लाउजमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर नक्षीकाम पाहायला मिळतील. तुम्हाला या प्रकारचा लेहेंगे ऑनलाइन आणि ऑफलाइन सहज मिळेल. तुम्ही हे फ्लॉरल एम्ब्रॉयडरी वर्क लेहेंगे 3,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.या लेहेंग्यासोबत तुम्ही कानातले देखील स्टाइल करू शकता.
झरी वर्क लेहेंगा
तुम्ही हे सुंदर वर्क असलेला झरी वर्क लेहेंगा परिधान करू शकता. हा लेहंगा ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही ठिकाणी सहजपणे मिळेल. या लेहंग्याची किंमत साधारणपणे 2,500 रुपयांन पर्यत आहे.
टिश्यू लेहेंगा
हा सुंदर टिश्यू लेहेंगा तुम्ही निश्चितपणे प्री वेडिंग शूटला घालू शकता. हा लेहंगा खूप सुंदर आणि आकर्षक वाटेल. तुमच्या प्री वेडिंग शूटसाठी उत्तम आहे.
हेही वाचा : Pre Wedding Shoot : प्री वेडिंग शूटसाठी बजेट फ्रेंडली डेस्टीनेशन
Edited By : Prachi Manjrekar