जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. ख्रिसमसचे आगमन होताच लोक, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतात. हा सण वर्षाच्या शेवटी येत असला तरी लोकांचा उत्साह तसाच असतो. आपल्याला सगळीकडे सजावट, झगमगते दिवे घरोघरी सांताक्लॉज पाहायला मिळते. हा सण केवळ धार्मिक नसून, एक सामाजिक उत्सव आहे, जो आनंद, प्रेम, उत्साह घेऊन येतो. या दिवशी आपण बऱ्याचदा लाल रंगाचे कपडे परिधान करतो. परंतु यावर्षी तुम्हाला रेडमध्ये काही हटके ट्राय करायचं असेल तर तुम्ही हे सुंदर रेड ड्रेस ट्राय करू शकता.
सिक्विन किंवा शिमर ड्रेस
तुम्ही ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी सिक्विन किंवा शिमर ड्रेस घालू शकता. यामध्ये तुम्हाला लाल रंग सहजपणे मिळेल. नाताळाच्या दिवसात हे ड्रेस खूप ट्रेंडमध्ये असतात. हे ड्रेस पार्टीसाठी देखील परफेक्ट आहेत.
वेलवेट रेड ड्रेस
तुम्हाला काही सिंम्पल ट्राय करायचं असेल तर तुम्ही वेलवेट रेड ड्रेस ट्राय करू शकता. हिवाळ्यासाठी हा ड्रेस उत्तम आहे.
ऑफ-शोल्डर
ऑफ-शोल्डर ड्रेस हा एक स्टयलिश पर्यायांपैकी एक आहे. हा ड्रेस लाल मध्ये खूप सुंदर दिसेल तुम्हाला ग्लॅमरस लूक देखील मिळेल.
मॅक्सी ड्रेस
तुम्ही ख्रिसमसाठी आरामदायक आणि काही एलिगंट आऊटफिटचा विचार करत असाल तर तुम्ही निश्चितपणे, हा मॅक्सी ड्रेस ट्राय करू शकता.
सेलिब्रेटी आऊटफिट
ख्रिसमसच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. आपण कोणता लाल ड्रेस घालू शकतो हे कळत नाही. अशावेळी तुम्ही सेलिब्रेटींचे काही ख्रिसमस आऊटफिट आयडियास घेऊ शकता.
अशाप्रकारे तुम्ही ख्रिसमसला हे रेड ड्रेस स्टाइल करू शकता.
हेही वाचा : Christmas Party Looks: ख्रिसमस पार्टीला हा परफेक्ट लूक करा ट्राय
Edited By: Prachi Manjrekar