Saturday, December 7, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीFashionWinter Fashion Tips : हिवाळ्यात हे स्लीव्हलेस स्वेटर करा ट्राय

Winter Fashion Tips : हिवाळ्यात हे स्लीव्हलेस स्वेटर करा ट्राय

Subscribe

हिवाळ्यात स्टयलिश दिसणे हे थोडं अवघडच असत. जाडजुड आणि उबदार कपडे घालून ते स्टाइल करायचं हे एका आव्हानाप्रमाणे आहे. बऱ्याचदा आपण स्टयलिश आणि हटके दिसण्यासाठी अनेक एक्सपेंरीमेट करत असतो. हिवाळ्यात स्टायलिश आणि सुंदर दिसण्यासाठी स्लीव्हलेस स्वेटर हा उत्तम पर्याय आहे. आज आपण जाणून घेऊयात, हिवाळ्यात कोणते स्लीव्हलेस स्वेटर आपण घालू शकतो.

तुमच्या वॉर्डरोबमध्ये स्वेटरचे वेगवेगळे कलेक्शन आहेत का ? तुम्ही या हिवाळ्यात तुमच्या कलेक्शनमध्ये काही बदल करू शकता. काही हटके स्टयलिश स्वेटर यामध्ये अॅड करू शकता .

- Advertisement -

शर्टेसह स्टाइल करा

हा लूक क्रिएट करण्यासाठी तुम्हाला एक बेसिक क्लासिक शर्ट लागेल. तुम्हाला एक क्लासिक लूक मिळेल. हा लूक तुम्ही सहजपणे कॅरी करू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही शर्टला मॅच होईल असे स्वेटर देखील घालू शकता. तसेच या शर्टसह तुम्ही बॅगी जीन्स देखील घालू शकता. तुमचा हा लूक खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल. तसेच तुम्ही काही सेलेब्रिटीसकडून देखील आयडिया घेऊ शकता.

ड्रेससह कॅरी करा 

स्लीव्हलेस स्वेटर हे तुम्हाला प्रत्येक लेंथमध्ये मिळेल. तुमच्या वॉर्डरोबमध्ये लॉन्ग स्वेटर तर असतीलच. ते स्वेटर तुम्ही ड्रेसप्रमाणे घालू शकता. या ड्रेसच्या खाली लॉंन्ग सॉक्स किंवा किंवा बूट्स तुम्ही घालू शकता. तुमचा हा लूक खूप आकर्षक वाटेल. तुम्ही हा लूक कोणत्याही पार्टीला किंवा बाहेर जाताना क्रिएट करू शकता.

- Advertisement -

स्वेटर ड्रेससह चांगले दिसेल

स्लीव्हलेस स्वेटर हे वनपीस ड्रेससह देखील चांगला दिसतात. तुमचा हा लूक खूप सुंदर वाटेल तुम्ही बेल्टने देखील हा ड्रेस स्टाइल करू शकता.

फुल स्लीव्हज स्वेटरमध्ये स्टायलिश दिसाल

तुम्ही स्लीव्हज स्वेटरसह फुल स्लीव्ह स्वेटर घालू शकता. यामध्ये तुम्ही कलर कॉन्ट्रास्ट करून बघू शकता. तुमच्या स्वेटरला डिझाइन असेल तर अजूनच सुंदर दिसेल. जर तुम्हाला जीन्स घालायची नसेल तर तुम्ही लाँग स्कर्ट देखील घालू शकता. स्कर्टमध्ये देखील तुम्हाला असंख्य प्रकार मिळतील. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार हे स्कर्ट निवडू शकता.

अशा प्रकारे तुम्ही हिवाळ्यात स्लीव्हलेस स्वेटर ट्राय करू शकता.

हेही वाचा : Winter Fashion Tips : हिवाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी या टिप्स करा फॉलो


Edited By : Prachi Manjrekar

- Advertisment -

Manini