Saturday, January 18, 2025
HomeमानिनीFashionFashion Tips : पार्टीला हे स्टयलिश आणि बॉडीकॉन ड्रेस करा ट्राय

Fashion Tips : पार्टीला हे स्टयलिश आणि बॉडीकॉन ड्रेस करा ट्राय

Subscribe

आजकाल मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन तुम्हाला प्रसंगानुसार असंख्य ड्रेस मिळतील. आता लवकरच ख्रिसमस आणि 31 येणार असून सगळीकडे आपल्याला जोरदार तयारी पाहायला मिळते. पार्टीचे सुंदर ऑउटफिट्स आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचदा आपण तेचतेच कपडे परिधान करतो. परंतु यावर्षी तुम्हाला काही ट्रेंडिंग आहि हटके असं ट्राय करायचं असेल तर तुम्ही बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकता.

बॉडीकॉन ड्रेस हा पार्टीसाठी एक उत्तम पर्याय आहे. या ड्रेसमुळे तुम्हाला एक स्टयलिश आणि ग्लॅमर्स लूक मिळेल. हा ड्रेस बऱ्याचदा पार्टी सारख्या ठिकाणी घातला जातो या ड्रेसमध्ये तुम्हाला अनेक पर्याय सहजपणे उपलब्ध मिळतील. बाजारात आणि ऑनलाइन देखील या ड्रेसची किंमत साधारणपणे 1००० ते 2००० आहे. आज आपण जाणून घेऊयात, पार्टीला कोणते स्टयलिश बॉडीकॉन ड्रेस ट्राय करू शकतो.

प्रिंटेड बॉडीकॉन

जर तुम्ही काही सिम्पल ट्राय करायचं असेल तर तुम्ही हा प्रिंटेड बॉडीकॉन ड्रेस घालू शकता. या ड्रेसमध्ये तुम्हाला विविध प्रकार आणि पर्याय डिझाइन्स मिळतील. हा ड्रेस सिम्पल जरी असला तर तुमचा लूक खूप एलिगंट दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टायलिश इअरिंन्ग देखील घालू शकता.

नेट बॉडीकॉन

नेट बॉडीकॉन ड्रेस हा बऱ्याच लोकांना घालायला आवडतो. हा ड्रेस खूप स्टयलिश आणि सुंदर देखील दिसतो. हा ड्रेस तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन बऱ्याच ठिकाणी सहजपणे मिळेल. या ड्रेसची किंमत साधारणपणे 1००० ते 2००० पर्यंत आहे.

सीक्वेंस वर्क बॉडीकॉन ड्रेस

असे अनेक कपडे आहेत जे आपण पार्टीला घालू शकतो. त्यापैकी सीक्वेंस वर्क बॉडीकॉन ड्रेस हा पार्टीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रकारच्या ड्रेसमध्ये तुम्हाला वर्क केलेले डिझाइन्स मिळतील. तसेच तुम्हाला असंख्य पर्याय देखील मिळतील. तसेच तुम्ही यावर हलक्या वजनाचे दागिने देखील स्टाइल करू शकता. या प्रकारचा ड्रेस तुम्हाला 500 ते 700 रुपयांपर्यंत मिळेल.

प्लेन बॉडीकॉन ड्रेस

तुम्ही पार्टीला प्लेन बॉडीकॉन ड्रेस देखील घालू शकता. हा ड्रेस खूप सुंदर आणि आकर्षक वाटतो. या ड्रेसमध्ये तुम्हाला असंख्य प्रकार आणि रंग मिळतील.

अशाप्रकारे तुम्ही ख्रिसमस किंवा 31 हे सुंदर बॉडीकॉन ड्रेस घालू शकता.

हेही वाचा : Fashion Tips : स्कर्ट आणि जीन्ससह हे सुंदर टॉप्स करा ट्राय


Edited By : Prachi Manjrekar

Manini