हिवाळ्यात आपण आपल्या फॅशनमध्ये अनेक बदल करत असतो. या ऋतूमध्ये थंडी जास्त असल्यामुळे आपण आपल्या पोषाखामध्ये देखील अनेक बदल करत असतो. आपण या दिवसात उबदार, स्टायलिश आणि आरामदायी कपड्यांचा समावेश आपल्या वॉर्डरोबमध्ये करतो. या दिवसात थंडी जास्त असल्यामुळे काही स्लीव्हलेस कपडे घालू शकत नाही. आजकाल बाजारात साड्यांसह तुम्हाला ब्लाउजमध्ये देखील असंख्य प्रकार मिळतील.
या थंडीच्या दिवसात वूलन ब्लाउज उत्तम आहे. हे तुमचा लूक आकर्षक आणि सुंदर बनवतील. या लोकरीच्या ब्लाउजच्या मदतीने तुम्ही तुमच्या नेहमीच्या साडीला वेगळा टच देऊ शकता. आज आपण जाणून घेऊयात, साडीसह कोणता वूलन ब्लाउज आपण ट्राय करू शकतो.
फूल स्लीव्हस एम्ब्रॉयडरी ब्लाउज
हिवाळ्यात अनेक लग्न आणि कार्यक्रम असतात. या खास प्रसंगासाठी आपण बऱ्याचदा साडी नसतो. पण तुम्ही आता हा वूलन ब्लाउज घालून तुमचा लूक हटके बनवू शकता. हा ब्लाउज खूप सुंदर आणि आकर्षक देखील वाटतो. या ब्लाउजला एम्ब्रॉयडरी असल्यामुळे तुम्हाला ज्वेलरी घालायची देखील आवशक्यता देखील नाही आहे. या प्रकारचा ब्लाउज तुम्ही रेशम, शिफॉन आणि ऑर्गेंजा साडीसह स्टाइल करू शकता.
ओव्हर कोट विंटर साड़ी ब्लाउज
ओव्हर कोट विंटर साड़ी ब्लाउज हा ट्रेडिशनल लूकला कॉन्टेम्प्ररी लूक देतो. जर तुम्हाला या थंडीच्या दिवसात काही एक्सपेरिमेंट करायचं असेल तर तुम्ही हा ट्रेंडी लूक ट्राय करू शकता. या ब्लाउजला असलेले थ्रेडवर्क, एम्ब्रॉयडरी, या ओव्हर कोट विंटर ब्लाउज खास बनवते.
जर काही हटके ट्राय करायचं असेल तर तुम्ही यावर जॅकेट देखील स्टाइल करू शकता. एम्ब्रॉयडरी जॅकेटमुळे या साडीच लूक अजून खुलून दिसेल.
हाय नेक विंटर साडी ब्लाउज
हाय नेक विंटर साडी ब्लाउज हा हिवाळ्यात तुम्हाला एक एथनिक आणि स्टयलिश लूक देतो. या ब्लाउजची नेकलाइन हाय असते. त्यामुळे थंडीच्या दिवसात हा ब्लाउज आरामदायी वाटतो. त्यामुळे तुम्हाला एक रॉयल लूक मिळतो.
अशाप्रकारे तुम्ही हिवाळ्यात कोणत्याही खास प्रसंगासाठी साडीसह हे वूलन ब्लाउज ट्राय करू शकता.
हेही वाचा : Fashion Tips : परिपूर्ण लूकसाठी साडीवर स्वेटर ऐवजी श्रग करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar