Monday, January 20, 2025
HomeमानिनीReligiousTulsi vivah 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे आणि काय करू...

Tulsi vivah 2024 : तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

Subscribe

मंगलाष्टके कानावर पडली की, डोळ्यासमोर लग्नसोहळा उभा राहतो. दिवाळीनंतर लग्नाचे सिझन सुरू होतो. पण, तुळशीच्या विवाहानंतरच लग्नसोहळे पार पडू लागतात. तुळशी विवाह हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते.तुळशी विवाह केल्याने घरात धनधान्यांची वाढ होते, असे मानले जाते. त्यामुळे तुळशी विवाहाच्या काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे जाणून घेऊयात. या दिवशी दिवशी काय करावे आणि काय करू नये

2024 तुळशी विवाह शुभ मुर्हूत –

यंदा वैदिक पंचागानुसार, कार्तिक शुक्ल तिथी मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 4.02 वाजता सुरू होईल आणि 13 नोंव्हेंबर रोजी दुपारी 1.01 वाजता समाप्त होईल. पण, उदयतिथीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल.

या दिवशी काय करावे –

  • तुळशी विवाहाच्या दिवशी रोप स्वच्छ करून घ्यावे.
  • तुळशीला सजवा. यासाठी तुम्ही कुंकू, हळदीचा वापर करू शकता.
  • विवाहासाठी छोटा मंडप तयार करा.
  • मंडप फूलांनी सजवा, रांगोळी काढा.
  • पूजेसाठी लागणारे साहित्य एका ठिकाणी गोळा करा, जेणेकरून गडबड होणार नाही.
  • या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा करू शकता.

काय करू नये –

  • तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये.
  • या दिवशी घरात मांस, मासे असे पदार्थ बनवू नयेत.
  • या दिवशी केवळ सात्विक अन्नच खावे.
  • विवाहाच्या दिवशी नकारात्मक विचार टाळावेत.

तुळशी विवाहाचे महत्त्व –

तुळशीला देवी लक्ष्मीचा अवतार मानले जाते. घरात तुळशीचे रोप असल्याने सकारात्मक उर्जेचा वावर वाढतो आणि नकारात्मक उर्जा नष्ट होते. तुळशीचा विवाह भगवान विष्णूंशी लावला जातो. सर्व देवांचे अधिपती विष्णू असल्याने या दोघांची पूजा केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini