घरात सुख-शांती नांदून कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी अनेक वास्तुउपायही केले जातात. वास्तुउपायांसह तुम्ही घरात काही झाडे देखील लावू शकता. घरात ही झाडे लावल्यावर सुख-समृद्धी येतेच त्याबरोबर घरातील वाईट दोष, नकारात्मक ऊर्जा निघून जाते. जाणून घेऊयात, सकारात्मक उर्जेसाठी घरात कोणती झाडे लावायला हवीत.
तुळस –
तुळशीचे रोप सर्वात प्रवित्र रोप मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार असे मानले जाते की, स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. तुम्ही तुळशीचे रोप ईशान्य किंवा पूर्व दिशेला लावू शकता. या दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते.
मनी प्लांट –
संपत्तीसाठी घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, हे प्लांट घरात लावल्याने पैसे आकर्षित होतात आणि घरातील वाईट, नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते.
ऑर्किड –
ऑर्किड घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन नातेसंबंध अधिक दृढ करते. तुम्ही घरातील कोपऱ्यात ऑर्किडचे झाड लावू शकता.
हळदीचे रोप –
वास्तूशास्त्रात हळदीच्या रोपाला सुख, समृद्धीचे कारक मानले जाते. असं म्हणतात की, या रोपामुळे घरातील नकारकात्मक ऊर्जा नष्ट होऊन आर्थिक अडचणी कमी करते.
शमी –
शमीचे रोप घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा वावर घरात वाढतो.
पाम ट्री –
घराच्या मुख्यदारासमोर पाम ट्री लावणे शुभ मानले जाते. यासह या झाडामुळे हवा शुद्ध होते आणि घरातील वातावरण सकारात्मक राहते.
चमेली –
घरासाठी चमेलीचे रोप अतिशय भाग्यवान आणि सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. तुम्ही हे झाड बाल्कनीत आणि दारासमोर लावू शकता.
हेही पाहा –