प्रत्येकाच्या घरात देवघर असते. देवघरातील देवांची रोज सकाळ-संध्याकाळ मनोभावे पूजा केली जाते. वास्तुशास्त्रात देवघराला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात, घरातील देवघराच्या संबधित काही नियम सांगण्यात आले आहेत. याचे आपण पालन केल्यास घरी सुख- शांती, आनंद नांदतो असे सांगितले जाते. याशिवाय असेही म्हणतात की, शास्रात सांगण्यात आलेल्या या नियमांचे पालन केल्यास घरात देवाचा वास राहतो आणि घरात सकारात्मकता टिकून राहते. वास्तुशास्त्रात घरात सकारात्मकता टिकून राहण्यासाठी काही गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेण्यासाठी देवघरात कोणत्या गोष्टी ठेवायला हव्यात,
शंख –
देवघरात शंख ठेवणे शुभ मानले जाते. देवघरात शंख स्थापित करुन त्याची मनोभावे पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन संपत्ती प्रदान करते, असे म्हणतात.
मोरपंख –
घरात मोरपंख ठेवणे शुभ मानले जाते. तुम्ही देवघरात मोरंपख ठेवल्यास भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते, असे मानले जाते.
गंगाजल –
हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत प्रावित्र्यमय मानले जाते. आंघोळीसाठी याचा वापर केल्यास खूप फायदा होतो. यासोबत देवघरात ठेवल्यास अद्भूत चमत्कार घडतात.
शाळीग्राम –
शाळीग्रामला देवाचे रुप मानले जाते. देवघरात एक शाळीग्राम ठेवणे शुभ मानले जाते. एकापेक्षा जास्त शाळीग्राम देवघरात ठेवू नये, असे करणे अशुभ मानले जाते.
देवपूजा करताना पुढील नियम महत्त्वाचे-
- पूजा करताना व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असेल याची खात्री करावे. देवपूजा करताना व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते.
- देवघराचे द्वार पश्चिम दिशेला असणे आवश्यक आहे.
- वास्तुशास्त्रातील नियमानुसार, देवघरात सूर्यप्रकाश येणे गरजेचे असते.
हेही पाहा –