Sunday, February 16, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : घरात शंख ठेवण्याचे आहेत नियम

Vastu Tips : घरात शंख ठेवण्याचे आहेत नियम

Subscribe

घरात सुख-शांती नांदावी नांदावी, असे प्रत्येकाला वाटते. घरातील सुख-शांतीसाठी वास्तू महत्वाची भूमिका बजावते. वास्तूशास्त्रात यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. यानुसार वास्तूदोष दूर करण्यासाठी, घराच्या प्रगतीसाठी घरात शंख ठेवण्याचा सल्ला दिला जातो. शंख लक्ष्मीचे रूप मानलं गेलं आहे. शास्त्रानुसार, घरात शंख ठेवणे शुभ मानले जाते. पण, शंख ठेवताना शास्त्रात सांगण्यात आलेले नियम पाळणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात, घरात शंख ठेवण्याचे नियम

शंखाचे प्रकार –

शंख दोन प्रकारचे असतात. एक दक्षिणावर्ती शंख आणि दुसरा वामावती शंख असते.

दक्षिणावर्ती शंख –

दक्षिणावर्ती शंखाचे तोंड उजवीकडे उघडते आणि हे लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते.

वामावती शंख –

वामावती शंखाचे तोंड डावीकडे उघडते. वामावती शंख खूप दुर्मिळ असते आणि महादेवाला समर्पित असते.

वास्तूशास्त्रातील शंखाचे नियम –

  • घराच्या उत्तर-पूर्वेला शंख ठेवणे शुभ मानले जाते.
  • शंख स्वच्छ जागी ठेवावा.
  • चुकूनही जमिनीवर शंख ठेवू नये.
  • पूजेत जो तुम्ही शंख वापरत असाल तर शंख फुंकणे टाळावे.
  • पूजेच्या वेळी गंगाजल आणि पाण्याने शंख भरुन देवाला अभिषेक करावा.
  • ईशान्य दिशेला शंख ठेवल्याने वास्तूदोष दूर होतात.
  • घरात शंख ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढतो.
  • शांती हवी असल्यास शंख घरात ठेवावा.
  • शंख देवघर, मुख्य दरवाजा किंवा अभ्यास्याच्या खोलीत शंख ठेवू शकता.
  • शंख नेहमी भगवान श्रीविष्णू, लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवावा.
  • शंखात ठेवलेले पाणी घरात शिंपडल्याने वातावरण शुद्ध होते.
  • शंख फुंकल्यावर त्यातून येणाऱ्या आवाजामुळे मानसिक शांती मिळते.

 

 

 

हेही पाहा –

Manini