Monday, January 20, 2025
HomeमानिनीReligiousvastu tips : बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नयेत या गोष्टी

vastu tips : बाथरूममध्ये चुकूनही ठेवू नयेत या गोष्टी

Subscribe

वास्तूशास्त्रासनुसार असे सांगिलते जाते की, घरातील प्रत्येक जागा महत्त्वाची असते. या जागांचे काही नियम असतात आणि आपण ते पाळायला हवेत. घरातील हॉ़ल, किचनप्रमाणे घरातील बाथरूमलाही वास्तूमध्ये विशेष स्थान आहे. त्यामुळे बाथरूममध्ये स्वच्छतेसोबत काही गोष्टी ठेवणे टाळायल्या हव्यात. या गोष्टी तुमच्या आरोग्यसोबत तुमच्या वास्तूत दोष निर्माण करणाऱ्या ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये ठेवणे टाळायला हव्यात.

वास्तूदोष निर्माण करणाऱ्या गोष्टी –

  • बाथरूममध्ये तुम्ही तुटलेली काच ठेवू नये. तुटलेल्या काचेमुळे नकारात्मक उर्जा निर्माण होते. ज्यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो.
  • बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नये. कारण सकाळी उठल्यावर तुमची नजर रिकाम्या बादलीवर पडल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो, असे म्हटले जाते. त्यामुळे कधीही रिकामी बादली बाथरूममध्ये ठेवू नका.
  • बाथरूममध्ये ओले अस्वच्छ कपडे गुंडाळून ठेवू नये, यामुळे वास्तूदोष निर्माण होतात.
  • बाथरूममध्ये कोणतेही रोप ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.

आरोग्यासाठी या वस्तू बाथरुममध्ये ठेवू नयेत –

  • अनेकजणांना बाथरूमध्ये शेव्हिंग करण्याची सवय असते. पण, तुम्ही सतत बाथरुममध्ये ब्लेड्सचा साठा करत असाल तर ही सवय आजच सोडून द्या. कारण बाथरूममधील आद्रर्ता शेव्हिंग ब्लेडसाठी चांगली नसते. यामुळे ब्लेड गंजण्याची शक्यता नसते.
  • बाथरूममध्ये टॉ़वेल ठेवण्याची अनेकजणांची सवय असते. काही जण टॉ़वेल वापरून झाल्यावरही तसाच बाथरूममध्ये ठेवतात. पण, यामुळे टॉ़वेल ओला राहिल्याने त्यावर बॅक्टेरीया जमा होतात आणि त्याला वास येऊ लागतो.
  • टुथब्रश बाथरूममध्ये ठेवला जातो. पण, असे करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. बाथरूममधील ओलाव्यामुळे टुथब्रशवर बॅक्टेरीया जमा होतात. त्यामुळे टुथब्रश जर ठेवणार असाल तर झाकून ठेवा.

 

 

 

 

 

 

 

 

 

Manini