वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्राप्रमाणेच महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्राचा आपल्या दैनंदिन आयुष्यात फार महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा असतो. कारण कळत-नकळत आपल्या हातून होणाऱ्या आणि घडणाऱ्या घटनांचा आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. अशावेळी आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी वास्तूशास्त्रातील उपाय केले जातात. उदाहरण द्यायचे झाल्यास, जेव्हा लोक नवीन घर खरेदी करतात तेव्हा त्यावेळी कळत-नकळत झालेल्या चूकांमुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. घरात वास्तूदोष निर्माण झाल्यावर नातेसंबंधात तणाव निर्माण होतो. पती-पत्नीच्या नात्यात वाद होण्यास सुरूवात होते. अशावेळी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. आज आम्ही वैवाहिक आयुष्यातील ताणतणाव दूर करण्यासाठी शास्त्रातील काही उपाय घेऊन आलो आहोत,
- जर तुम्हाला वैवाहिक आयुष्य सुख-शांतीने जगायचे असल्यास घराच्या उत्तर-पूर्व दिशेला निळा किंवा जांभळा रंग द्यायला हवा.
- पती-पत्नीत सतत वादविवाद होत असतील तर बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला बनवावा आणि बेडरूमला भडक रंग न देता हलका रंग द्यावा.
- बेडरूम हलक्या रंगाची फुलांची नक्षी असलेली बेडशीट तुम्ही वापरायला हवी.
- पती-पत्नीत सतत भांडणे होत असतील बेडरूमचा काळा, निळा रंग यांस कारणीभूत असू शकतो.
- बेडसमोर चुकूनही आरसा लावू नये. वास्तूनुसार बेडसमोर आरसा लावल्याने नात्यामध्ये तणाव निर्माण होतो.
- वैवाहिक आयुष्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी झोपताना डोके दक्षिण किंवा पूर्व दिशेला असेल याची खात्री असावी.
- बेडरूम कायम स्वच्छ आणि सुगंधी असेल याची काळजी घ्यावी. यामुळे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम बहरत राहील.
- बेडरूममध्ये प्रत्येक शुक्रवारी गुलाबांची फुले ठेवावीत. यामुळे पती-पतीच्या नात्यातील प्रेम वाढते.
- तुम्ही वैवाहिक आयुष्यातील ताणतणाव दूर करण्यासाठी बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावू शकता.
- बेडरूममध्ये लोखंडी पलंगाचा वापर करू नये. यामुळे झोपायला त्रास तर होतोच शिवाय वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम व्हायला सुरूवात होते.
हेही पाहा –