हिंदू धर्मात हनुमान जयंतीला विशेष महत्त्व आहे. यावर्षी 23 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या विशेष प्रसंगी, जर तुम्हीही तुमच्या घरात हनुमानाची मूर्ती बसवणार असाल. तर वास्तूशी संबंधित काही गोष्टींची विशेष काळजीही घ्या.
वास्तूनुसार देवी-देवतांच्या मूर्ती घरात बसवल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते, असे मानले जाते. पण जर चुकीच्या दिशेला त्यांना स्थानापन्न करण्यात आले तर वास्तु दोषांमुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे शुभ राहील?
वास्तूनुसार हनुमानजींची मूर्ती किंवा चित्र दक्षिण दिशेला लावावे. या दिशेला फोटो लावताना हनुमानजी बसलेल्या स्थितीत असावेत हे ध्यानात ठेवावे. असे मानले जाते की असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात.
वास्तूनुसार बेडरूममध्ये हनुमानजीची मूर्ती ठेवणे शुभ नाही. यामुळे वास्तुदोष होऊ शकतो
वास्तूनुसार हनुमानजींचा फोटो किंवा मूर्ती जिन्याच्या खाली आणि स्वयंपाकघरात लावणे टाळावे.
वास्तूच्या नियमानुसार शत्रू, घरगुती त्रास, नातेसंबंधातील कलह आणि कुटुंबातील नकारात्मकता टाळण्यासाठी पंचमुखी हनुमानजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. असे मानले जाते की मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजीचे चित्र लावल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर राहते..
Edited BY
Aarya Joshi