घरात सुख-शांती हवी असल्यास घरात वास्तूदोष नसावा असे म्हटले जाते. वास्तूदोषामुळे घरात सुख- शांती नांदत नाही, कुटूंबियाच्या आरोग्यावर परिणाम होतो. वास्तूदोष कित्येकदा आपल्या हातून कळत-नकळत घडणाऱ्या गोष्टींमुळे निर्माण होतो.खरं तर, वास्तूदोष घरातील काही वस्तूंमुळे सुद्धा निर्माण होतो. काही वस्तूंचा घरात सकारामत्मक आणि काही वस्तूंचा नकारात्मक प्रभाव पडू लागतो. या वस्तूंमुळे आर्थिक संकटे सुरू होतात. त्यामुळे अशा वस्तू घरातून वेळीच बाहेर काढणे हितावयाचे मानले जाते.
- चावी नसलेले टाळे आणि वापरात नसलेल्या किल्या घरात ठेवू नयेत. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात.
- तडा गेलेली काचेची वस्तू घरात ठेवू नये. काचेची फूटलेली खिडकी असेल तर त्वरीतच बदलावी.
- देवघरात खंडीत झालेली देवाची मूर्ती ठेवू नये. असल्यास वेळ न दवडता लगेचच विसर्जित करावी.
- घरात काटेदार झाडे ठेवू नयेत. या झाडांमुळे आर्थिक अडचणी सुरू होतात.
- घरात फाटलेले कपडे असतील तर काढून टाकावेत. कारण फाटलेले कपडे शुक्र ग्रहाचा नाश करतात. ज्यामुळे आर्थिक अडचणी सुरू होतात.
- जुने शुज, चप्पल असतील तर ताबडतोब काढून टाकावेत. ज्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.
- घरात महाभारताचे चित्र, ताजमहालचे चित्र, बुडणारी बोट, हिंस्त्र प्राण्यांचे चित्र, काटेरी झाडांची चित्रे लावू नयेत. यामुळे घरातील वातावरणात नकारात्मक होते आणि घरावर आणि कुटूंबावर याचा परिणाम दिसून येतो.
- प्लास्टिकचा अतिवापरही आर्थिक अडचणींना आमंत्रण देणारा असतो. त्यामुळे घरात जास्त प्लास्टिकच्या वस्तू असतील त्वरीत काढून टाकायला हव्यात.
- घरात बंद घड्याळ किंवा खराब घड्याळ ठेवू नये. अशाने पैशांची चणचण जाणवू शकते.
- घरात जुनी वर्तमानपत्रे ठेवली असतील तर ताबडतोब काढून टाकावीत.
- घरात खराब केबल्स, चार्जर, बल्ब अशा वस्तू असतील घराबाहेर काढा, अशा गोष्टींमुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.
- झोपताना पाण्याची बॉटल जवळ घेऊ नये. हे मानसिक स्वाथ्यासाठी योग्य मानले जात नाही.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde