Sunday, February 9, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips For Kitchen : किचनमध्ये देवघर असावे का?

Vastu Tips For Kitchen : किचनमध्ये देवघर असावे का?

Subscribe

प्रत्येकाच्या घरात छोटं असो वा मोठं देवघर असतेच. देवघरात कुलदैवत, श्री गणेश, देवी लक्ष्मी, विठ्ठल-रुक्मिणी अशा देवतांची प्राणप्रतिष्ठा करुन नित्यनेमाने पूजा केली जाते. दररोज मनोभावे पूजा केल्यास देवाची कृपा आपल्यावर राहते, असे मानले जाते. देवघरासाठी एकेकाळी घरे मोठी असल्याने स्वतंत्र खोली असायची. पण, वाढत्या औद्योगिकीरणामुळे घरं लहान होत चालली आहे. लहान घरात जागा नसल्याने देवघरासाठी एखादा कोपरा किंवा किचनमध्ये ठेवण्यात येते. जागे अभावी आपण देवघर किचनमध्ये ठेवतो खरे पण वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. चला तर मग या लेखातून जाणून घेऊयात, किचनमध्ये देवघर असण्याचे काय परिणाम होतात.

  • शास्त्रानुसार, किचनमध्ये देवघर असणे शुभ मानले जाते. असं म्हणतात की, ज्या घरातील किचनमध्ये देवघर असते, त्या कुटूंबातील व्यकती तापट स्वभावाचे असतात.
  • किचनमध्ये देवघर असेल तर कुटूंबातील एखाद्या सदस्याला रक्ताशी संबधित आजाराला सामोरे जावे लागू शकते.
  • शास्त्रानुसार, देवघर आणि स्वयंपाक घर कधीही एकत्र असू नये. कारण किचन अग्नि तत्वाशी संबंधित असते, त्यामुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
  • किचनमध्ये वारंवार काही ना काही शिजवले जाते. यात अनेकदा मांसाहारी पदार्थ असतात. ज्यामुळे वातावरणात अशुद्धता निर्माण होते. ज्याचा थेट परिणाम देवघरातील ऊर्जेवर होण्याची दाट शक्यता असते.
  • किचनमध्ये वारंवार काही ना काही हालचाली, आवाज असतो. याउलट देवघरासाठी महत्वाची असणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याआधीच किचनमधील वातावरणामुळे भंग पावते. त्यामुळे किचनमध्ये देवघर नसावे असे सांगितले जाते.
  • घरातील देवघराचे पावित्र्य राखणे खूप महत्वाचे आहे. असे न केल्यास वास्तूदोष निर्माण होतो.
  • हल्ली घर लहान असल्याने कित्येकजणांचे देवघर किचनमध्ये असतात. अशावेळी मांसाहारी पदार्थ घरात बनवणे टाळावे.
  • स्वयंपाकघरात देवघर असेल तर ईशान्य दिशेला ठेवावे. शास्त्रात, या दिशेला देवघर ठेवल्यास लाभ होतो असे म्हणतात.
  • किचनमध्ये देवघर असलेच आणि दुसरीकडे ठेवणे शक्य नसेल तर लाल रंगाचे असावे, असे करणे शुभ मानले जाते.
  • ज्या घरात किचनमध्ये स्टोअर रुम असते. अशा घरातील कुटूंबप्रमुखाला नोकरी किंवा व्यवसायात विविध अडचणींना सामोरे जावे लागते.

 

 

 

हेही पाहा –

Manini