जन्माला आलेला प्रत्येकजण पैसे कमावण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे. पैसे कमवण्याच्या शर्यतीत दिवसरात्र मेहनत घेण्यात येत आहे. कोणी नोकरी करत आहे तर कोणी व्यवसाय करतो आहे. पण, काहींना दिवसरात्र मेहनत करूनही हवे तसे फळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले उपाय करू शकता. आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. या उपायामध्ये तिजोरीत एक यंत्र ठेवण्यास सांगितले आहे. तुम्ही जर हे यंत्र तिजोरीत ठेवल्यास आर्थिक अडचणी दूर होऊन धनवृष्टी नक्कीच होऊ शकते.
तिजोरीत ठेवा हे यंत्र –
घरात पैसे ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा कपाटातील तिजोरी असते. काही वेळा अनेक तिजोरीत चुकीच्या गोष्टी ठेवल्याने किंवा चुकीच्या दिशेला पैसे ठेवल्याने आर्थिक अडचणींमध्ये वाढ होते. वास्तुशास्त्रात तिजोरी पैसे ठेवण्यासोबत कुबेर यंत्र ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पैशांसोबत तुम्ही जर कुबेर यंत्र ठेवलेत तर संपत्तीत वाढ होते, असे म्हटले जाते. भगवान कुबेर यांना पैशांची देवता मानली जाते. त्यामुळे तुम्ही कुबेराची पूजा करायला हवी, असे केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि पैशांची कमतरता जाणवत नाही. त्यामुळे तिजोरीत कुबेर यंत्र नक्कीच ठेवायला हवे.
तिजोरी कोणत्या दिशेला ठेवायचे?
वास्तुशास्त्रात तिजोरी ठेवण्याचे काही नियम सांगण्यात आले आहे. या नियमानुसार, तिजोरी कायम घराच्या दक्षिण दिशेला ठेवावी आणि तिचे दार उघडल्यावर उत्तरेकडे जाईल याची खात्री करावी. अशा पद्धतीने तिजोरी ठेवल्याने आर्थिक लाभ होतो. वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेल्या या नियमानुसार तिजोरी ठेवल्यास अनेक प्रकारे फायदे होतात.
या गोष्टी टाळा –
- वास्तुशास्त्रानुसार, घरातील तिजोरीत कपडे, भांडी, फाइल्स तिजोरीत ठेवू नये.
- तिजोरीच्या समोर कोणत्याही देवतांचे फोटो लावू नयेत.
- तुम्ही तिजोरीत परफ्युम, अगरबत्ती आदी सुगंधित वस्तु ठेवू शकता. यामुळे पैसा तिजोरीकडे खेचला जातो, असे म्हणतात.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde