Monday, January 20, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : घरात वास्तुदोष कधी निर्माण होतो?

Vastu Tips : घरात वास्तुदोष कधी निर्माण होतो?

Subscribe

घरात वास्तुदोष असेल तर घरातील वातावरण बिघडते. घरातल्या मंडळीना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. घरात सतत वादविवाद होतात. वास्तूशास्त्रात असे म्हणण्यात आले आहे की, घरातील वास्तूदोष व्यक्तीचे भाग्य बदलू शकतो, प्रगतीचे रस्ते बंद करू शकतो. त्यामुळे घरातील वास्तूदोषाचं वेळीच निवारण होणे आवश्यक असते, असे वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहे. सामान्यत: असे म्हटले जाते की, घरातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या नसतील तर वास्तूदोष निर्माण होतो. पण, शास्त्रानुसार, वास्तूदोषाची कारणे अनेक असू शकतात.

 

वास्तूदोषाची सामान्य कारणे –

  • घरातील एखाद्या कोपऱ्यात जर अंधार असेल तर सुर्यप्रकाश पोहोचत नसेल तर घरात वास्तूदोष निर्माण होतो.
  • घरातील स्वयंपाकघर आणि देवघर या ठिकाणी असलेली अस्वच्छता वास्तूदोषाचे कारण बनू शकते
  • अनेकजणांना घरातील मुख्य दरवाज्यासमोर चप्पल-बुट काढणे वास्तूदोषाचे कारण बनू शकते. त्यामुळे तुम्हालाही जर दरवाज्यासमोर चप्पल-बुट काढायची सवय असेल तर आजच बदला.
  • घरात रात्रभर खरकटी भांडी न घासता तशीच ठेवणे.
  • घरात जुन्या, वापरात नसलेल्या वस्तू ठेवणे, आपण आठवणी म्हणून अशा वस्तू ठेवतो. पण, या गोष्टीमुळे वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता असते.
  • घरासह घराचे प्रवेशद्वार स्वच्छ न करणे.

वास्तूदोषाची लक्षणे –

  • घरातील वास्तूदोषाचे मुख्य कारण म्हणजे कुटूंबातील सदस्य वारंवार आजारी पडते. सतत काही ना काही आजारपण घरात सुरू राहते.
  • घराची आर्थिक स्थिती बिघडत असेल तर हे सुद्धा वास्तूदोषाचे लक्षण असू शकते.
  • घरात होणारे वादविवाद, कुटूंबातील तणाव ही सुद्धा वास्तूदोषाचे लक्षण आहे.
  • तुमचे काम थोडक्यासाठी पूर्ण होत नसेल, काम करण्यास अडथळा येत असेल तर हे सुद्धा वास्तूदोषाचे लक्षण असू शकते.

 

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini