Monday, January 20, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : देवघरातील मूर्तीची उंची किती असावी?

Vastu Tips : देवघरातील मूर्तीची उंची किती असावी?

Subscribe

घर कितीही लहान असले तरी घरात देवघर हे असतेच. ज्यांची घरे मोठी असतात अशा घरांमध्ये आकाराने मोठे देवघर बनवले जातात. देवघरात विविध देवांच्या मूर्ती एकत्र ठेवल्या जातात. यात कुळदेवता, श्री गणेश, लक्ष्मी , खंडोबा अशा मूर्ती असतात. पण, तुम्हाला हे माहित आहे का शास्त्रात देवघरात ठेवलेल्या देवाच्या मूर्ती किंवा फोटो योग्य दिशेसह योग्य उंचीसोबत असायला हवी,असे सांगण्यात आले आहे. जाणून घेऊयात, देवघरातील मूर्तीची उंची किती असायला हवी.

उंची किती असावी –

देवघरातील मूर्ती उंचीने मोठ्या नसाव्यात. शास्त्रात देवांच्या मूर्ती किती असाव्यात सांगण्यात आले आहेत. साधारणपणे, देवांच्या मूर्ती 3 इंचापेक्षा जास्त नसावी, असे सांगितले आहे. तुमचा हाताचा अंगठा जेवढा आहे त्यापेक्षा जास्त उंची नसावी असे सांगितले आहे. कारण मोठ्या आकाराच्या मूर्तीची पूजा करताना अनेक नियम पाळावे लागते. त्यामुळे अंगठ्यापेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती देवघरात ठेवू नये.

शिवलिंग लहान असावे –

शास्त्रानुसार , देवघरातील शिवलिंग आकाराने लहान असावे. घरामध्ये मोठे शिवलिंग ठेवू नये. काहींच्या देवघरात शिवलिंगाची मूर्ती किंवा फोटो असतात, याबातीतही हा नियम लागू होतो.

भंग मूर्ती ठेवू नयेत –

घरात देवांचे भंग फोटो किंवा मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे देवघरात चुकूनही भंग पावलेल्या मूर्ती ठेवू नयेत. अशा मूर्ती किंवा फोटो असतील तर त्वरील काढून टाकाव्यात. अशा मूर्तीचे विसर्जन तुम्ही नदी,तलाव अशा ठिकाणी करू शकता.

मूर्ती कशा असाव्यात –

देवघरातील मूर्ती तांब्या-पितळेच्या असाव्यात, ज्यामुळे तुटण्याची भिती नसते. याशिवाय मूर्तीला स्नान घालणेही सोपे जाते.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini