देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे. दररोज सकाळ-संध्याकाळी देवाची पूजा केली जाते. देवाची पूजा केल्याने व्यक्तीच्या घरात सकारात्मक उर्जा राहते आणि नकारात्मक उर्जा नष्ट होते. छोटं का होईना प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच. काहींच्या घरात मोठमोठे देव्हारे ठेवले जातात. देवघर मोठे असल्यावर साहजिकच मूर्तीची उंची वाढवली जाते. पण, तुम्हाला माहित आहे का, शास्त्रात देवघराची आणि देवघरातील मूर्तींच्या उंचीबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. त्यानूसार देवघरातील मूर्तीची उंची असणे शुभ मानले जाते.
मूर्तीची उंची किती असावी-
- देवघरातील मूर्ती उंच नसाव्यात. असे म्हणतात की, घरातील मंदिरात मोठ्या मूर्ती ठेवल्याने प्रावित्र्य राहत नाही. त्यामुळे मूर्ती लहानच असाव्यात.
- वास्तूशास्त्रानुसार, मूर्ती 10 इंचापेक्षा जास्त मोठी नसावी. तुमच्या हाताच्या अंगठ्याएवढीच मूर्ती देवघरात ठेवणे शुभ मानले जाते.
- नियमानूसार, देवघरातील मूर्तींचे मुख ईशान्य दिशेला असावे. वास्तूशास्त्रात देवघरातील मूर्तींचे मुख कसे असावे, याबाबत नियम सांगण्यात आले आहेत.
- जर तुमचे देवघर उंचीने आणि आकाराने मोठे असेल, तर तुम्ही कमीत कमी 6 इंच आणि जास्तीत जास्त 9 इंचाएवढ्या मूर्त्या ठेवू देवघरात ठेवू शकता.
- देवघरातील मूर्तीं खराब किंवा खंडित झालेल्या नसतील याची काळजी घ्यावी.
- क्रोधीत किंवा भयभीत अशा देवतांच्या मूर्ती घरात ठेवू नयेत.
- घरात जर शिवलिंग असेल तर लहान असावे. घरात मोठे शिवलिंग ठेवू नये.
- शास्त्रानुसार, देवी-देवतांना जमिनीवर ठेवू नये. मूर्ती नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवावी.
- देवघरात तुटलेले फोटो ठेवू नयेत. असे केल्याने वास्तूदोष निर्माण होतो.
देवघराची उंची किती असावी?
- देवघर लाकडाचे किंवा संगमरवरी दगडाचे असावे.
- मंदिर जमिनीपासून 6 ते 12 इंच वर असावे असे सांगितले जाते.
हेही पाहा –