गावी आपण कित्येक घराच्या दाराबाहेर पारिजातकाचा सडा पाहतो. पारिजातकाचा सुवास हा मनाला भुरळ घालणारा असतो. पारिजातकाचा सुंगध हा प्रत्येकाला आवडतो आणि हे फूल देवी लक्ष्मीचेही आवडते फूल आहे. पारिजातकाच्या झाडाच्या बाबतीत तशा अनेक मान्यता आहे. काही जणांचे असे म्हणणे असते की, घराबाहेर पारिजातकाचे झाड असणे अशुभ तर काही जणांचा असा समज असतो की, शुभ आहे. त्यामुळे जाणून घेऊयात, वास्तुशास्त्रात या झाडाबाबत काय सांगण्यात आले आहे.
पारिजातकाचे महत्त्व –
- वास्तुशास्त्रात पारिजातकाचे झाड असणे शुभ मानले जाते. या झाडामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आणि दिर्घायुष्यासाठी पारिजातकाचे झाड अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
- वास्तुशास्त्रात असे म्हटले गेले आहे की, ज्याच्या दाराबाहेर पारिजातकाचे असते तो नशीबवान असतो. या फुलांच्या सुवासाने स्ट्रेस दूर होतो आणि मन शांती होते.
- घरातील आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी असे वाटतं असेल पारिजातकाचे झाड दारासमोर अवश्य लावावे.
- घराच्या दाराबाहेर पारिजातकाचे झाड असणे घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे कुटूंबातील वातावरण आनंदीमय राहते.
कोणत्या दिशेला असावे पारिजातकाचे झाड –
ईशान्य दिशा –
ईशान्य दिशेला पारिजातकाचे झाड असणे शुभ असते. यामुळे घरात सुख-शांती नांदते. यासह आर्थिक अडचणी दूर होतात.
- Advertisement -
पूर्व दिशा –
तुम्ही पारिजातकाचे झाड पूर्व दिशेलाही लावू शकता.
पश्चिम किंवा वायव्य –
पश्चिम किंवा वायव्य दिशेलाही पारिजातकाचे झाड असणे वास्तुशास्त्रात योग्य समजले जाते.
- Advertisement -
- पारिजातक झाडाच्या बाबतीत एक नियम लक्षात ठेवावा की, दक्षिण दिशेला झाड लावू नये.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde