हिरवीगार झाडे घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी फार उपयुक्त ठरतात. पण, वास्तू शास्त्रानुसार घराची शोभा वाढवणारी झाडे योग्य दिशेला लावणे देखील महत्वाचे आहे. जर तुम्ही योग्य दिशेला झाडे लावली नाहीत तर याचा नकारात्मक परिणाम घरात जाणवायला सुरूवात होते. घरात अशांतता, वादविवाद, आर्थिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे घराच्या भरभराटीसाठी आणि आर्थिक समस्या टाळण्यासाठी घरात दक्षिण दिशेला कोणती झाडे लावावी पाहूयात,
कडूलिंबाचे झाड –
घरात दक्षिण दिशला कडूलिंबाचे झाड लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने शनिदोष कमी होण्यास मदत होते आणि आर्थिक समस्याही कमी होतात.
मनी प्लांट –
घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. मनी प्लांट लावल्याने पैशांची चणचण दूर होते. पण, घरात मनी प्लांट लावताना दक्षिण दिशेला लावायला हवे. मनी प्लांट चुकूनही उत्तर दिशेला लावू नये. अशाने नकारात्मक परिणाम दिसू शकतात.
कोरफड –
घरात कोरफड लावल्याने सकारात्मक परिणाम दिसू शकतात. कोरफड लावल्याने समाजात मान सन्मान आणि इच्छीत फळ मिळण्यास मदत होते.
चमेलीचे झाड –
नवरा बायकोच्या नात्यात जर प्रॅाब्लेम सूरू असतील तर घरात दक्षिण दिशेला चमेलीचे झाड लावणे फायद्याचे ठरते. चमेलीच्या फुलांमूळे घरात सुख – शांती नांदण्यास मदत होते.
घरात चुकूनही काटे असणारे झाडे लावू नयेत. अशी झाडे लावणे अशुभ मानले जाते. काटेदार झाडांव्यतिरीक्त पिंपळाचे रोप, चिंचेचे झाड लावू नयेत.
हेही पाहा :
Edited By – Chaitali Shinde