अनेक लोकांना घरात प्राणी पाळण्याची आवड असते, तर अनेक लोक त्यांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी पाळीव प्राणी पाळतात. पाळीव प्राण्यांमध्येही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम आणि काळजी आपल्याला पाहायला मिळते. आज आपण जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार, कोणते प्राणी पाळल्याने तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येऊ शकते याबद्दल.
धनसंपत्ती घरात येते :
वास्तुशास्त्रानुसार मांजर पाळणे शुभ आहे. वास्तु मान्यतेनुसार, मांजर तुमच्यासाठी सौभाग्य घेऊन येते. सोनेरी रंगाची,पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची मांजर पाळणे अधिक शुभ मानले जाते. यामुळे तुमच्यासाठी घरात पैशाच्या येण्याचे मार्ग खुले होतात. असेही म्हटले जाते की मांजर काळ्या जादूच्या प्रभावापासून माणसाचे रक्षण करते. यासोबतच घरात काळा कुत्रा पाळणे देखील शुभ मानले जाते, कारण त्यामुळे घरातील अनेक संकटे दूर होतात.
याची नक्की काळजी घ्या :
वास्तुशास्त्रानुसार, घरी पोपट पाळणे देखील खूप शुभ मानले जाते. याचा घरावर सकारात्मक प्रभाव पडतो, कुटुंबात आनंद येतो. पोपट नेहमी घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावा. यातून तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. यासोबतच, हे देखील लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा पोपट आनंदी असतो तेव्हाच आनंद आणि समृद्धी येते. धार्मिक मान्यतेनुसार, ज्या घरात पोपट आनंदी नसतो, तिथे नकारात्मक परिणाम वाढू लागतात.
हे प्राणी आहेत शुभ :
तुम्ही अनेक लोकांना मासे पाळताना पाहिले असेल. ते दिसायला जितके सुंदर असतात तितकेच ते वास्तूशास्त्रानुसार शुभ मानले जातात. घरी मासे ठेवल्याने व्यक्तीचे सौभाग्य आणि समृद्धी दोन्ही वाढते. यासोबतच, वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे घरी कासव पाळणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे अनेक रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात.
घरात येईल सुख आणि समृद्धी :
हिंदू धर्मात गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे. वास्तुशास्त्रा नुसार, घरी गाय पाळल्याने देव-देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहतात. जर तुम्हाला घरी गाय पाळणे शक्य नसेल, तर त्याऐवजी तुम्ही गायीची सेवा करण्यातही योगदान देऊ शकता. सुख आणि समृद्धीसाठी, दररोज गायीला भाकरी किंवा हिरवा चारा खायला घाला.
हेही वाचा : Beauty Tips : चेहऱ्याचा पफीनेस करा कमी या एक्सरसाइजने
Edited By – Tanvi Gundaye