लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहे. आपले नवीन वर्ष आनंदात जावो हीच प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. अशा परिस्थितीत नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी वास्तुनुसार तुम्ही तुमच्या घरात कोणते बदल करू शकता ते जाणून घेऊयात, जेणेकरून घरात सकारात्मक परिणाम दिसू शकतील.
या दिशेला ठेवा तिजोरी :
वास्तूनुसार घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला (ईशान्य कोपऱ्यात) तिजोरी ठेवावी. ही दिशा संपत्तीची देवता कुबेर आणि धनाची देवी असलेल्या लक्ष्मीची दिशा मानली जाते. त्यामुळे या दिशेला तिजोरी ठेवल्याने तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो.
या गोष्टी घरात लावा :
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही घराच्या ईशान्य कोपऱ्यात निसर्गाशी संबंधित चित्रे जसे की उगवता सूर्य किंवा नद्यांचे चित्र लावू शकता. यासोबतच किचनच्या आग्नेय कोपऱ्यात लाल बल्ब लावून तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात.
मीठाने करा हा उपाय :
जर तुमच्या घरात नकारात्मकता पसरली असेल तर पाण्यात थोडे मीठ मिसळा आणि रोज या पाण्याने लादी पुसा. असे केल्याने नकारात्मकता दूर होते. तसेच संध्याकाळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मीठ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर फेकून द्या. असे केल्याने तुम्ही नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळवू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा :
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गोलाकार कडा असलेले फर्निचर ठेवणे शुभ मानले जाते. यासोबतच तुटलेल्या वस्तू, बंद पडलेली किंवा खराब झालेली घड्याळे, रद्दी किंवा अनावश्यक वस्तू घराबाहेर फेकून द्याव्यात. कारण या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात.
हेही वाचा : Vastu Tips : तिजोरीत ठेवा कमळाचे फूल, आर्थिक चणचणी होतील दूर
Edited By – Tanvi Gundaye