वास्तूशास्त्रानुसार , घरात मनीप्लांट लावण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत. वास्तूनियमांनुसार, घरात सुख-शांती आणि सौभाग्य यांचे आगमन व्हावे याकरता मनीप्लांट योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे. कारण चुकीच्या दिशेला मनीप्लांट लावल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आज आपण जाणून घेऊयात मनीप्लांट लावण्याची योग्य पद्धत आणि कोणत्या ठिकाणी मनीप्लांट लावल्यास लाभ मिळू शकतात याविषयी.
या दिशेला लावावे मनीप्लांट :
अनेकदा लोकांच्या घरात आपल्याला मनीप्लांटचे रोप पहायला मिळते. बहुतांशी लोक केवळ हौस म्हणून याला घरात लावतात. वास्तू नियमांनुसार, मनीप्लांटचे रोप घराच्या दक्षिण पू्र्व दिशेला लावणे शुभ समजले जाते. या दिशेला आग्नेय दिशा असं म्हणतात. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.
या दिशेला रोप लावू नये :
वास्तू शास्त्रानुसार, मनीप्लांट घरात कधीही उत्तर पूर्व दिशेला लावू नये. कारण या दिशेचे प्रतिनिधीत्व बृहस्पती करतात आणि या दिशेला शुक्रविरोधी समजले जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो.
मनीप्लांट लावण्याची योग्य पद्धत :
मनीप्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेला लावू नये.
मनीप्लांट पश्चिम आणि दक्षिण -पश्चिम म्हणजेच नैऋत्य दिशेला लावू नये.
मनीप्लांटला थेट ऊनापासून दूर ठेवा.
मनीप्लांट घराच्या बाहेर खिडक्यांच्या सजावटीसाठी लावू नये.
मनीप्लांटची पाने जर सुकली असतील किंवा पिवळी पडली असतील तर त्यांना लगेच काढून टाकायला हवे.
मनीप्लांटमध्ये दर चार महिन्यांनी नवीन खत टाकायला हवे.
मनीप्लांट घरी लावण्याचे फायदे :
वास्तू नियमांनुसार, घरात मनीप्लांट लावल्याने धन आणि सुखसमृद्धी येते.
यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
मनीप्लांट घरातील वातावरण शुद्ध करते.
हे हवेत असणारे फॉर्माल्डिहाइड, बेंझीन , जाइलिन आणि कार्बन मोनॉक्साइड यासारख्या प्रदूषण तयार करणाऱ्या घटकांना हटवण्याचे काम करते.
मनीप्लांट अधिकाधिक वाढत जाणे हा प्रगतीचा संकेत समजला जातो.
हेही वाचा : Vastu Tips : घराबाहेर पारिजातकाचे झाड असणे शुभ की अशुभ ?
Edited By – Tanvi Gundaye