Friday, March 28, 2025
HomeमानिनीReligiousVastu Tips : ऑफिस डेस्कवर ठेवू नयेत ही रोपे

Vastu Tips : ऑफिस डेस्कवर ठेवू नयेत ही रोपे

Subscribe

वास्तुशास्त्रात सांगितलेले उपाय खूप फलदायी ठरतात. असे मानले जाते की ऑफिस वास्तू टिप्सचे पालन केल्याने, संपत्तीची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि व्यवसायात प्रचंड नफा मिळू शकतो. बरेच लोक त्यांच्या ऑफिसच्या डेस्कवर वेगवेगळ्या प्रकारची रोपे ठेवतात, ज्यामुळे त्यांना फायद्याऐवजी नुकसानाला सामोरे जावे लागते.
वास्तुशास्त्रानुसार, ऑफिसच्या डेस्कवर काही झाडे ठेवल्यास दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. तसेच, नोकरीत अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, या लेखात आपण जाणून घेऊयात ऑफिस डेस्कवर कोणत्या प्रकारची रोपे ठेवू नयेत याविषयी.

लक्ष्मीचा कोप होऊ शकतो 

Vastu Tips: These plants should not be kept on the office desk

हिंदू धर्मानुसार तुळशीच्या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे . ही वनस्पती खूप पवित्र मानली जाते. या रोपाची लागवड करण्यासाठी नियमांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. तसेच, या रोपाजवळील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कारण जेवणाचे पदार्थही डेस्कवर ठेवलेले असतात. जे उष्टे देखील असू शकते. म्हणून, तुळशीचे रोप ऑफिसच्या डेस्कवर ठेवू नये. यामुळे देवी लक्ष्मी रागावू शकते, ज्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

कामात अडथळा येऊ शकतो.

Vastu Tips: These plants should not be kept on the office desk

वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे बांबूच्या रोपाला सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अनेकांना त्यांच्या ऑफिस डेस्कवर बांबूचे रोप ठेवायला आवडते. परंतु वास्तुशास्त्राच्या अनुसार, हे रोप ऑफिस डेस्कवर ठेवल्याने मानसिक शांती प्रभावित होऊ शकते. तसेच कामात अडथळा येऊ शकतो. या कारणास्तव, बांबूचे रोप डेस्कवर ठेवणे टाळावे.

प्रमोशनमध्ये समस्या येऊ शकते.

Vastu Tips: These plants should not be kept on the office desk

कोरफडीचे रोप लावणे शुभ मानले जाते, परंतु ते ऑफिसच्या डेस्कवर ठेवणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार, हे रोप ऑफिसच्या डेस्कवर ठेवल्याने आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम होतो आणि पदोन्नतीमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, कारण या रोपाला काटे असतात.

कामावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो

Vastu Tips: These plants should not be kept on the office desk

याशिवाय, ऑफिसच्या डेस्कवर कॅक्टसचे रोप ठेवणे टाळावे. या वनस्पतीची पाने काटेरी असतात. अशा परिस्थितीत, हे रोप डेस्कवर ठेवल्याने कामावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा : Vastu Tips : बेडरुममध्ये आरसा लावायचा की नाही


Edited By – Tanvi Gundaye

Manini